facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / मुंबई / विकासाच्या रुळांवर!

विकासाच्या रुळांवर!

मुंबई लोकलच्या विकासकामांसाठी स्वतंत्रपणे कार्यरत असणाऱ्या ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळ’ (एमआरव्हीसी)तर्फे प्रकल्प राबवले जातात. रेल्वे, महाराष्ट्र सरकार आणि जागतिक बँकेकडून निधी मिळवून प्रकल्प आखले जातात. त्याचाच भाग म्हणून ‘एमयुटीपी-३’प्रकल्प आखण्यात आला.

काय आहे प्रकल्प?
केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी या प्रकल्पास मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा आवाका ११ हजार ४४१ कोटी रुपये इतका आहे. त्यातून मुंबईच्या विकासासाठी अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये

– विरार ते डहाणू चौपदरीकरण हा ६३ किमी

– प्रकल्प खर्च ३,५५५ कोटी रु.

– मुंबई सेंट्रल ते डहाणूपर्यंत लोकल, मेल/एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका

त्यासाठी जागतिक बँकेकडून २,८४४ कोटी रुपये, केंद्र आणि राज्य सरकारकडून ७११ कोटी रु.चा सहभाग

– पनवेल-कर्जत दुहेरीकरण

– अपेक्षित खर्च २,०२४ कोटी रुपये

– सीएसटी ते कर्जतपर्यंतचे अंतर १०० किमी असून नवीन कॉरिडॉरमुळे सीएसटी-कर्जत व्हाया पनवेल अंतर कमी होईल. १०० किमीमध्ये घट होऊन ते अंतर ७८ किमी होईल. प्रवास वेळेत ३० ते ४० मिनिटांची बचत अपेक्षित. जागतिक बँकेकडून १६९९ कोटी रु, केंद्र-राज्याकडून ४०५ कोटी रु. सहभाग..

ऐरोली-कळवा लिंक (एलिव्हेटेड)

– अंतर – तीन किमी

– अपेक्षित खर्च – ४२८ कोटी रु.

– फायदा- ऐरोली-कळवा एलिव्हेटेड लिंक रोडमुळे थेट कल्याण आणि नवी मुंबई रेल्वे मार्गाने जोडणे शक्य.

– जागतिक बँकेकडून ३४२ कोटी तर केंद्र-राज्याकडून ८६ कोटी रु. सहभाग.

अपघात नियंत्रण योजना

– अपेक्षित खर्चः ५२० कोटी रुपये

– स्टेशनेः २२

– रुळांवरील अपघातांवर नियंत्रण

– जागतिक बँकेकडून ५२० कोटी रु., केंद्र-राज्याकडून ३९० कोटी रु. सहभाग.

– पश्चिम रेल्वेवरील चार, हार्बरवरील सहा आणि मध्य रेल्वेवरील १२ स्टेशन्सचा समावेश आहे.

– त्यात पादचारी पूल उभारण्याचा समावेश आहे.

नवीन गाड्यांचा समावेश

– ४७ गाड्या

– अपेक्षित खर्च २,८९९ कोटी रु.

– जागतिक बँकेकडून १,१६० कोटी रु., केंद्र-राज्याकडून १,७३९ कोटी रु.

तांत्रिक सहाय्यासाठी योजना

– ६५ कोटी रु.

– २०११ मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या संकल्पनेस हिरवा कंदील दर्शवला होता.

– २०१२ मध्ये एमयूटीपी ३ हा प्रकल्प व्यवहार्य असल्याचे स्पष्ट झाले.

– ऑगस्ट २०१६ मध्ये निती आयोगाने या प्रकल्पास मान्यता दिली.

– प्रकल्पपूर्तीसाठी २०२१चे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.

– रुळांवरील अपघातांवर नियंत्रण

– २०११ मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या संकल्पनेस हिरवा कंदील दर्शवला होता.

– २०१२ मध्ये एमयुटीपी ३ हा प्रकल्प व्यवहार्य असल्याचे स्पष्ट झाले.

– ऑगस्ट २०१६ मध्ये निती आयोगाने या प्रकल्पास मान्यता दिली.

– प्रकल्पपूर्तीसाठी २०२१ चे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *