facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / सरकार शोधणार गुणी खेळाडू

सरकार शोधणार गुणी खेळाडू

राष्ट्रीय पातळीवर गुणवंत खेळाडूंचा शोध घेण्याचा उपक्रम केंद्र शासनाच्यावतीने नव्या वर्षात हाती घेण्यात येणार आहे. क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल आणि अॅथलेटिक्स या पाच क्रीडा प्रकारांचा या उपक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. निवडण्यात आलेल्या खेळाडूंना दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
स्कूल स्पोर्टस् प्रमोशन फाउंडेशन या संस्थेला केंद्र शासनाने गुणवत्ता शोध कार्यक्रमासाठी मान्यता दिली आहे. क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल आणि अॅथलेटिक्स या पाच क्रीडा प्रकारांच्या जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमधून प्रत्येक पातळीवर उत्कृष्ट संघांची निवड करण्यात येणार आहे. त्या संघांची पुढील पातळीवरील स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना दहा लाख रूपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली जाणार आहे, अशी माहिती क्रीडा सहसंचालक एन. एम. सोपल यांनी दिली.
जानेवारी महिन्यात पाचही क्रीडा प्रकारांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी १७ जानेवारी २०१७पर्यंत प्रवेशिका भरणे आवश्यक आहे. www.sspf.in या वेबसाइटवर ऑनलाइन प्रवेशिका भरणे गरजेचे आहे. वेबसाइटवर या योजनेची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी रविशंकर पंडित यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

गुणवंताच्या शोधासाठी प्रवेश शुल्क
क्रिकेट खेळासाठी पाच हजार रुपये, तर फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारांकरिता प्रत्येकी दोन हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. राष्ट्रीय गुणवत्ता शोध उपक्रमात राज्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे, हा केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे, असे सोपल यांनी सांगितले.

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *