facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / ​दहा महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा दाखल

​दहा महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा दाखल

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – बांधकाम साइटवरील कामगाराचा खून केल्याप्रकरणी दहा महिन्यानंतर तोफखाना पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश अशोक साळवे (वय ३१, रा. उमापूर, गेवराई, बीड) या बांधकाम मजुराचा खून केल्याप्रकरणी ठेकेदार महेश रावसाहेब देवरे (रा. कसबेवस्ती, तपोवन, नगर) व संतोष विठ्ठल गुंजाळ (रा. उमापूर, बीड) या दोघांना पोलिसांनी अटक केली या दोघांना १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गणेश साळवे हा नगर-मनमाड रोडवरील एका बांधकाम साइटवर कामगार होता. या कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला २३ फेब्रुवारी २०१६ रोजी तोफखाना पोलिस स्टेशनला एकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. मृत कामगाराच्या पत्नीने घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. पोलिस हेडकॉन्टेबल दगडू शेरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. नगर-मनमाड रोडवरील संजोग हॉटेल जवळ राजेंद्र अग्रवाल यांच्या मालकीच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. रात्रीचा वेळी आरोपी यांनी गणेश साळवे याला पार्टी करण्याच्या बहाणाने बोलवून घेतले. तसेच अज्ञात कारणासाठी डोक्यात व पोटावर मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या जखमी अवस्थेत गणेश याचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या कामगाराचा कोणत्या कारणामुळे खून झाला याचा तपास आता पोलिस करत आहे.

तोफखाना हद्दीत दोन ठिकाणी

एक हजार व पाचशे रुपयांचा नोटाबंदीनंतर थांबलेल्या घरफोड्याचे घटना पुन्हा सुरू झाल्या असून, तोफखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक घरफोडी होऊन सोन्याचे दागिने व पैसे चोरट्यांनी लंपास केले आहे. पोखर्डी (ता. नगर) या गावात वृध्द व्यक्तीला चोरट्यांनी मारहाण केली आहे. तोफखाना हद्दीत ढवणवस्ती व निर्मलनगर येथे घरफोडी झाली आहे. ढवणवस्ती येथील विजया शंकरराव भांबड या शनिवारी रात्री घरात झोपलेल्या होत्या. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकाटून घरात प्रवेश करत कपाटाची उचकापाचक करून वीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तर निर्मलनगर येथे रवींद्र गणपत पानसंबळ यांची घरी चोरट्यांनी चोरी केले. पानसंबळ हे कुटुंबासह रात्री घरात झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, पाचशे रुपयांच्या आठ नोटा असे आठ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. तर एमआयडीसी हद्दीतील पोखर्डीतील निमसेवस्ती येथील गोरख शिवाजी निमसे यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली. त्यात सोन्याचे मंगळसूत्र व त्यात दोन हजार रुपयांची नोट, शंभर व दहा रुपयांच्या नोटा अशी १० हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. तसेच शिवाजी निमसे या वृध्द व्यक्तीला चाकू मारून जखमी केले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

कायनेटिक चौकातून ट्रक चोरीला

शहरातील कायनेटिक चौकातील येथील भारत वजनकाटा येथून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपये किंमतीची ट्रक चोरून नेली असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. ट्रकचालक शरद बबन परभणे याने फिर्याद दिली. या ट्रकद्वारे जिल्ह्यामध्ये रेशनशिंगचे धान्याचा पुरवठा केला जात होता. ट्रकचालक परभणे हा शुक्रवारी एमआयडीसीतील सरकारी गोडावूनमधून रेशनिंगची धान्य भरून श्रीगोंदा येथे पुरवठा करून नगरला आला होता. त्या ठिकाणी भारत वजनकाटा येथे ट्रक लावली होती. ड्रायव्हर हा घरी गेल्यानंतर रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने ही ट्रक चोरून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *