facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / अश्लील चित्रफितीवरुन दगडफेक

अश्लील चित्रफितीवरुन दगडफेक

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – विवाहितेची अश्लील चित्रफित तयार केल्याच्या कारणावरुन खासगी भिशीचालक मुबारक बशीर पकाली याच्या घर, दुकान व यंत्रमाग कारखान्यावर संतप्त जमावाने हल्ला चढवत दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून घटनास्थळी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर संशयितावर कारवाईमया मागणीसाठी कारंडे मळ्यातील नागरिकांनी शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. दरम्यान, पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मुबारक पकाली व फिरोज दस्तगीर नदाफ (दोघे रा. कारंडे मळा) यांच्यावर बलात्कार व अश्लील चित्रफित प्रसारीत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

शहापूर परिसरातील कारंडे मळा परिसरात राहणारा मुबारक पकाली हा खासगी कार्डभिशी चालवितो. त्याचबरोबर त्याचा बांगड्या विक्रीचाही व्यवसाय आहे. भिशीच्या माध्यमातून चार महिन्यांपूर्वी भागातीलच एका विवाहितेशी त्याचा संपर्क झाला. त्या महिलेला ऑक्टोबर महिन्यात मुबारक याने ५० हजार रुपये देतो असे सांगून जयसिंगपूर येथील हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार करुन नवऱ्याला व मुलाला ठार मारण्याची धमकी देत तिची अश्लील चित्रफितही बनविली. त्यानंतर मुबारक याचा मित्र फिरोज याने या चित्रफिती माझ्याकडे सुरक्षित ठेवतो असे सांगून घेतल्या होत्या. दोन दिवसांपासून कारंडे मळा परिसरात ही चित्रफित व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणानंतर मुबारक हा फरार झाला. त्याच्या कृष्णकृत्याचे पडसाद मंगळवारी सकाळी परिसरात उमटले. मुबारक हा घराकडे येणार असल्याची माहिती समजल्याने मोठ्या संख्येने नागरिक कारंडे मळा परिसरात जमा झाले. मुबारक याला पकडून त्याच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करीत महिला तसेच जमलेल्या संतप्त नागरिकांनी शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्याकडे शिष्टमंडळाने कारवाईची मागणी केली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देत जमावाला पांगविले.

दरम्यान, संतप्त जमाव पकाली याच्या घराच्या दिशेने गेला. जमावाने पकालीच्या घरावर जोरदार दगडफेक करीत खिडक्यांच्या काचांसह घरातील साहित्याची नासधूस केली. यावेळी पकाली याच्या कुटुंबियांकडून विरोध झाल्याने हाणामारीचा प्रकारही घडला. मुबारक याचे वडील बशीर, नातेवाईक अकबर मोमीन यांच्यासह महिलांनाही जमावाकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर जमावाने आपला मोर्चा कृष्णानगर येथील पकाली याचे दुकान व कारखान्याकडे वळविला. इचलकरंजी-शहापूर रस्त्यालगत असलेल्या मासूम बँगल स्टोअर्स या दुकानासह पानपट्टीवर दगडफेक करीत मोडतोड केली. त्याचबरोबर लगतच्या दोन यंत्रमाग कारखान्यावरही दगडफेक करीत नुकसान केले. दगडफेकीच्या या प्रकाराने कारंडे मळ्यासह कृष्णानगर परिसरातील वातावरण तणावपूर्व बनले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जमावाला सौम्य लाठीमार करीत पांगविले. घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे यांनी भेट देऊन पाहणी केली. बलात्कार करुन तसेच अश्लील चित्रफित बनवून बदनामी केल्याप्रकरणी पिडीत महिलेकडून तक्रार देण्यात आली असून संशयित पकाली व नदाफ यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *