facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / कॅशलेस व्यवहारात तीस टक्के वाढ

कॅशलेस व्यवहारात तीस टक्के वाढ

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटाबंदीनंतर जिल्ह्यामध्ये कार्डद्वारे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. गेल्या महिन्याभरात या व्यवहारांत २५ ते ३० टक्कांनी वाढ झाली असल्याचा दावा बँकेच्या अधिकाऱ्याने केला आहे. नोटाबंदीच्या काळामध्ये पेट्रोलपंप, व्यापारी यांना वेगवेगळ्या बँकांनी चार हजार स्वाइप मशिन वाटली आहेत. तसेच, आणखी पाच हजार मशिन वाटण्याचे नियोजन बँकांकडून सुरू आहे.

नोटाबंदीनंतर रोकड तुटवड्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार ठप्पे झाले होते. त्यात तोडगा काढण्यासाठी ‘पॉइंट ऑफ सेल’ (पीओएस) मशिनचा पर्याया निवडला असून, त्यात गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल भरणे, बाजारातून खरेदी सुरू आहे. खासगी व सार्वजनिक बँकांनी आपल्या ग्राहकांना थेट मशिन दिली असून, त्या ठिकाणी कार्ड स्वाइप करून व्यवहार केले जात आहेत. सुरुवातीला साडेआठशे मशिन व्यापाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्या मशिन आता वाढविण्यात आल्या असून, चार हजार मशिन झाल्या आहेत. महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये ही मशिन बसविण्यात आल्याने नागरिकांना करही भरता येणार आहे. रोकड तुटवड्यानंतर कॅशलेस व्यवहार शहरात व ग्रामीण भागात वाढत आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेत हे व्यवहार ३० टक्क्यांनी वाढत असल्याची विविध बँकांची माहिती असल्याची माहिती लीड बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र दायमा यांनी दिली आहे. तसेच, आणखी मशिनची मागणी होत असल्याने पाच हजार मशिन देण्याचे नियोजन बँकांनी केले आहे. मशिन वेगवेगळ्या बँकांनी मागितली आहेत. या मशिन आल्यानंतर रोकड तुटवड्याचा परिणाम कमी जाणवेल, असा दावा बँकांचे प्रतिनिधी करत आहेत.

आणखी कॅशलेस व्यवहार होण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पुढाकार घेतला असून, त्यासाठी बैठका घेऊन नियोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहेत. तसेच, शेतकऱ्यांकडे किसान कार्ड आहेत. त्यांना या कार्डद्वारे खते-बियाणे व इतर वस्तू खरेदी करता येण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. ई-वॉलेट, रुपेकार्ड, अॅपचा वापर करण्याबाबत जनजागृती केली जाईल.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *