facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / जीएसटी पुस्तिका आली मराठीत

जीएसटी पुस्तिका आली मराठीत

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – ‘गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अर्थात जीएसटीबद्दल इंग्रजीमध्ये अनेक पुस्त‌िका, लेख आहेत. मात्र, मराठीत स्वतंत्र अशी माहिती पुस्तिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे ही पुस्तिका व्यापारीवर्गास फलदायी ठरेल,’ असा आशावाद केंद्रीय उत्पादन शुल्क आणि अबकारी कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिनेश पांगारकर यांनी मंगळवारी व्यक्त केला.

जिल्हा व्यापारी महासंघ आणि औरंगाबाद मशिनरी डिलर्स असोसिएशन प्रायोजित ‘जीएसटी-माहिती पुस्तिके’चे प्रकाशन अदालत रोडवरील मनमंदिर येथे करण्यात आले. यावेळी पांगारकर बोलत होते. व्यासपीठावर विक्रीकर विभागाचे सहआयुक्त डी. एम. मुगळीकर, महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, मासिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, लेखक सीए उमेश शर्मा यांची उपस्थिती होती. यावेळी पांगारकर म्हणाले, ‘जिल्हा महासंघाने ही जीएसटी पुस्तिका काढून खूप मोठे काम केले आहे. यातून तळागाळापर्यंतच्या लोकांना मराठीत कायद्याविषयी ज्ञानप्राप्त होईल. या कायद्याविषयी सातत्याने बदल होतील. तसे बदल पुस्तिकेही करण्यात यावेत,’ अशा सूचना पांगारकर यांनी केली.

यावेळी मुगळीकर म्हणाले, ‘या कराविषयी फार चर्चा आहे. तो कर येणार येणार म्हणून काही दिवसांपासून सातत्याने वाट पाहिली जात आहे. तो २०१७ ला निश्चितच येणार आहे. त्याचे रजिस्ट्रेशन औरंगाबादमध्ये सर्वाधिक झाले. त्यासाठी व्यापारीवर्गाने जो पुढाकार घेतला, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो.’

उमेश शर्मा म्हणाले, ‘हे पुस्तक लिहिताना मी सीए म्हणून आव्हान स्वीकारले. आज दत्तजयंतीच्या मुहूर्तावर या पुस्तकाचे प्रकाशन होताना मला आनंद होत आहे. यात नक्कीच बदल करत राहू. मी नेहमी अध्यात्म‌िकता आणून हा क्लिष्ट विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ही पुस्तिका लिहिताना खूप आव्हान वाटले.’ सूत्रसंचालन व आभार राजन हौजवाला यांनी व्यक्त केले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *