facebook
Monday , February 20 2017
Breaking News
Home / Featured / थीम पार्क फेब्रुवारीअखेर येणार पूर्णत्वास

थीम पार्क फेब्रुवारीअखेर येणार पूर्णत्वास

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – जैन समुहाकडून उभारले जाणारे अद्ययावत थीम पार्क पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या प्रथम स्मृती दिनापर्यंत म्हणजेच २५ फेब्रुवारी २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी
व्यक्त केला. त्या पद्मश्री डॉ. भवरलाल जैन थीम पार्कच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या.

काव्यरत्नावली चौकालगत असलेल्या नियोज‌ति जागेवर हे जैन थीम पार्क उभे राहत आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते भूम‌पिूजन करण्यात आले. जळगाव शहरामध्ये अद्ययावत सुविधा असलेले व सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण असावे म्हणून महापौर नितीन लढ्ढा हे प्रयत्नशील होते. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी त्यासाठी मान्यता देत त्यांच्या प्रयत्नांमधून काव्यरत्नावली चौकालगत असलेली जागा उपलब्ध करून दिली. त्यावर सध्या अस्तित्त्वात असलेली सर्व झाडे आहे तशीच ठेवून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन व संचालक अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली थीम पार्कचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

यावेळी माजी आमदार सुरेशदादा जैन, महापौर नितीन लढ्ढा, डॉ. मुन्शी, जेष्ठ साहित्यिक पद्मश्री ना. धों. महानोर, दलीचंद जैन, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे, पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर, मनपा आयुक्त जिवन सोनवणे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक अतुल जैन, उपमहापौर ललित कोल्हे उपस्थित होते.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *