facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / मुंबई / भुजबळांचा जामीन हायकोर्टानं फेटाळला!

भुजबळांचा जामीन हायकोर्टानं फेटाळला!

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गेल्या नऊ महिन्यांपासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सुटकेची आशा पुन्हा एकदा मावळली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सुटकेसाठी आता भुजबळ यांना सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढावी लागणार आहे.

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनासह विविध घोटाळ्यांप्रकरणी भुजबळ यांना १४ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तुरुंगात असलेल्या भुजबळ यांनी सुटकेसाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, त्यांना दिलासा मिळू शकला नाही. अखेर त्यांनी आपली अटकच बेकायदेशीर असल्याचं सांगत सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. प्रकृती अस्वास्थ्यामुळं आपल्याला लवकरात लवकर जामीन मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

 न्यायमूर्ती रणजित मोरे व न्या. डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढं भुजबळांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. त्यावेळी ईडीनं केलेली अटक बेकायदा नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळं भुजबळ यांच्यापुढं आता सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालय हाच पर्याय उरला आहे.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *