facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / मनसेचे नगरसेवक सर्वांत ‘कार्यक्षम’

मनसेचे नगरसेवक सर्वांत ‘कार्यक्षम’

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – पुणे महापालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सर्वांत ‘कार्यक्षम’ असल्याचे स्पष्ट करून त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच इतर राजकीय पक्षांमध्ये त्यांच्याविषयी उत्सुकता असल्याचा दावा पक्ष नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी केला. प्रत्येक निवडणुकीत पक्षांतर होतच असल्याचे सांगून पक्ष नेतृत्व सर्व विद्यमान नगरसेवकांच्या सातत्याने संपर्कात असल्याची पुष्टी त्यांनी जोडली. तसेच, मनसेचे प्रमुख नगरसेवक इतर पक्षांच्या वाटेवर असल्याच्या निव्वळ वावड्या उठवल्या जात असल्याचा खुलासा त्यांनी केला.

गेल्या अनेक महिन्यांपासून शहर मनसेच्या पुनर्बांधणीत आणि संघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नांदगावकर यांनी सर्व पुणेकरांना उद्देशून जाहीर पत्राद्वारे मनसेच्या नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षांत सर्वोत्तम काम केल्याचे प्रशस्तिपत्र दिले आहे. मनसेकडे चांगल्या नगरसेवकांची किंवा पुन्हा निवडून येण्याची क्षमता असलेल्यांची संख्या सर्वाधिक असल्याने त्यांच्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्याबद्दल केली जाणारी चर्चा म्हणजे त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावतीच आहे, असे ठाम मत नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे.
गुंडांना प्रवेश देऊनही ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा लगावणारा भाजप, सरकारमध्ये असूनही दुसऱ्यांना दोष देणारा ‘संभ्रमित’ शिवसेना, मनी आणि मसलद्वारे महापालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनविणारा ‘राष्ट्रवादी’ आणि ‘काँग्रेस’ या पक्षांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच, महापालिका निवडणुकीसाठी मनसेतर्फे जोरदार तयारी सुरू असून, पुणेकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पालकमंत्र्यांचाही धंगेकरांना विरोध

पक्षाचे नगरसेवक पक्षांतर करणार नसल्याचा दावा एका बाजूने मनसेच्या वरिष्ठांकडून केला जात असताना, दुसरीकडे त्यांना पक्षात घेण्यावरून भाजपमध्येही अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. खासदार संजय काकडे यांच्या पुढाकाराने कसब्यातील मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना पक्षात प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु, त्याचे खंडन करून पालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर म्हणाले, ‘पक्षात अनेक सक्षम उमेदवार असून, जुन्या-जाणत्या कार्यक्रमांना योग्य संधी दिली जाईल. रवींद्र धंगेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. त्यांना प्रवेश देण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांचाही विरोध आहे.’

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *