facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / रेल्वेचे तिकीटही मिळणार ‘कॅशलेस’

रेल्वेचे तिकीटही मिळणार ‘कॅशलेस’

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यासाठी, चालू तिकीट घेण्यासाठी आणि पार्सल विभागातून माल पाठविण्यासाठी भरावयाचे शुल्क आता विनारोकड भरता येणार आहे. केंद्र सरकारच्या ‘कॅशलेस’ योजनेला बळ देण्यासाठी रेल्वेच्या पुणे विभागाने ‘कॅशलेस’ सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध बँकांच्या माध्यमातून ‘पीओएस’ मशिन उपलब्ध करून दिले जाणार आहे. आठवडाभरात संपूर्ण विभागात ही सेवा कार्यान्वित होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला आवर घालण्यासाठी चलनातून पाचशे व हजार रुपयाच्या नोटा बंद केल्या. त्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी रोखीने व्यवहार न करता ‘कॅशलेस’ व्यवहार करण्याची संकल्पना पुढे आली. नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात ‘कॅशलेस’ व्यवहार करावेत, यासाठी विविध प्रकारच्या सवलती जाहीर केल्या. तसेच, सध्या सुट्या पैशांवरून नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात पुणे स्टेशन, शिवाजीनगर स्टेशन, खडकी, तळेगाव, सातारा, मिरज, कोल्हापूर आणि बारामती या स्टेशनवर बॅकिंग व्यवहारासाठी ‘पीओएस’ मशिन ठेवले जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक (वाणिज्य) संजय कुमार यांनी दिली.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर पुणे रेल्वे स्टेशनवरील तिकीट आरक्षण केंद्रावर एक ‘पीओएस’ मशिन कार्यान्वित करण्यात आले आहे. नागरिकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत बँकांकडून आणखी मशिन उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

शहरात बारा मशिन

पुणे स्टेशनवर आठ ‘पीओएस’ मशिन कार्यान्वित केल्या जाणार आहेत. स्वारगेट, फडके हौद, कॅम्प आणि कर्वे रस्त्यावरील तिकीट आरक्षण केंद्रावरही प्रत्येकी एक मशिन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *