facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / मुंबई / शिक्षण समुपदेशक विजय जामसंडेकर यांचे निधन

शिक्षण समुपदेशक विजय जामसंडेकर यांचे निधन

शैक्षणिक कार्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असलेले आणि विविध ​शैक्षणिक प्रयोगांचा पाठपुरावा करणारे ​शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील कार्यकर्ते विजय जामसंडेकर यांचे सोमवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक कन्या आहे.

विजय जामसंडेकर यांनी गेली १८ वर्षे त्यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठी संपूर्ण राज्यभरात अनेक कार्यशाळा घेऊन त्यांचे समुपदेशन केले. शिक्षणाचा त्यांनी विविध अंगाने विचार, प्रचार आणि प्रसार केला. त्यासाठी निरनिराळी​ माध्यमे वापरली. ते उत्तम शिक्षक होतेच, परंतु ‘अभिज्ञान’ या वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक विशेषांकाची निर्मिती व संपादन करून त्याद्वारे शिक्षक संवाद, विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास, पालकांची शाळा असे विषय हाताळले.

‘प्रत्येकाचं आभाळ वेगळं’ आणि ‘स्वप्न आणि दृष्टिकोन’ या रंगमंचीय कार्यक्रमाची निर्मिती व सादरीकरण त्यांनी महाराष्ट्रात जागोजागी केले,

त्यातून विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या हाताळल्या. महाराष्ट्रात ठिकठिकाणी तब्बल ४०० शिक्षणविषयक व्याख्याने दिली. दहावी आणि बारावी परीक्षांकरिता बोर्डातर्फे समुपदेशक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही जामसंडेकर यांनी काम केले. माध्यमिक शिक्षकांच्या नव्या समुपदेशन पदविका अभ्यासक्रम समितीचे ते सदस्य सल्लागार होते.

‘अभिरुची’ या वाङ्मयीन नियतकालिकाचे तसेच ‘शिक्षणवेध’ या मासिकाचे ते कार्यकारी संपादक होते.

सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे गावच्या माधवराव पवार विद्यालयातील ५५० विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जीवनकौशल्याचं नव शिक्षण हा अभिनव उपक्रम राबवला होता.

विजय जामसंडेकर यांच्या निधनाने आंबेडकरी विचारधारेतील शिक्षणाच्या संबंधित मूलभूत विचार करणारे झपाटलेले व्यक्तिमत्व हरपल्याची भावना शिक्षण क्षेत्रातील अनेकांनी व्यक्त केली.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *