facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / सारंगखेड्यात ‘चेतक’चे आकर्षण

सारंगखेड्यात ‘चेतक’चे आकर्षण

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – नंदुरबार ये‌थील सारंगखेडा एकमुखी दत्तयात्रेला व चेतक फेस्ट‌विलला मंगळवारपासून सुरुवात झाली असून, महानुभाव पंथीयांच्या तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्सवात पार पडले. पहाटेपासून दर्शनासाठी महिला व पुरूष भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. यावर्षी दत्त जयंतीपासून येथे सारंगखेडा चेतक फेस्ट‌विल आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे ही यात्रा पर्यटनाच्या आंतराष्ट्रीय कॅलेंडरवर पोहचली आहे. सारंगखेडा येथील दत्त मंदिराला सुमारे ३०० वर्षांची परंपरा आहे.

महानुभाव पंथीयांच्या पद्धतीनुसार दत्ताच्या मूर्तीस पंचामृताने मंगलस्नान करण्यात आले. यावेळी गुरू श्री दिवाकरमुनी पंजाबी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. मूर्तीचा सर्व साजशृंगार झाल्यानंतर विडा समर्पण झाले. मंदिराचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अर्जुन पाटील, उपाध्यक्ष रवी पाटील, सदस्य रमेश पाटील, भीकन पाटील, छोटूलाल पाटील आदी उपस्थित होते. या मंदिराजवळ तुला करून नवस फेडण्यासाठी गर्दी होत आहे.

तोरणमाळचाही होणार विकास!

सारंगखेडा चेतक फेस्ट‌विल उद्घाटन सोहळा दत्त मंदिराच्या प्रांगणात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी कलशेट्टी, नंदुरबार जि. प. माजी अध्यक्ष कुमुदिनी गावीत, महानंदचे संचालक विक्रांतबाबा रावल, पर्यटन विभागाचे विभागीय व्यवस्थापक नितीन मुंडावरे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी घनशाम मंगळे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार नितीन गवळी उपस्थित होते. त्यानंतर घोडे बाजारात सारंगखेडा संस्थान व फेस्ट‌विलच्या ध्वजाचेरोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यात खासदार डॉ. हिना गावीत आणि विक्रांतबाबा रावल उपस्थित होते.

पर्यटन विभागाच्या सहकार्याने सारंगखेडा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्यात आता सारंगखेडासह प्रकाशा व तोरणमाळचाही विकास होणार आहे. चेतक फेस्ट‌विल जगाच्या पर्यटन स्थळांच्या यादीत पोहचला आहे. चेतक फेस्ट‌विलचे प्रणेते जयपालसिंह रावल व जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे अवाहन आमदार डॉ. विजय कुमार गावित यांनी केले.

फेस्ट‌विल होतोय फेमस पर्यटन विभागाच्या पुढाकारामुळे सारंगखेडी येथे होणारा चेतक फेस्ट‌विल हा जगाच्या नकाशावर जात आहे. हा फेस्टीवल परंपरा टीकविण्याच्या सोबत अनेकांना रोजगार देत आहे. पर्यटकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे, असे पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *