facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / कंत्राटी कामगारांना जुन्या नोटांमध्ये पगार

कंत्राटी कामगारांना जुन्या नोटांमध्ये पगार

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – नोटगोंधळामुळे जुन्या नोटा खपवण्याचे विविध प्रकारचे पर्याय शोधले जात असतानाच, मॅक्स नावाच्या कंपनीने कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना जुन्या हजार रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून पगार दिला आहे. या कामगारांकडे बँकेचे खाते नसल्याने बाद झालेल्या नोटांचे काय करायचे, हा प्रश्न कायम आहे.

मॅक्स कंपनीकडून मुंबईतल्या वेगवेगळ्या आस्थापनांना कंत्राटी मनुष्यबळ पुरवले जाते. चेंबूर येथील झेन रुग्णालयामध्येही मॅक्सने सफाई कामगारांसह अकुशल मनुष्यबळ पुरवले आहे. मॅक्सला चेकद्वारे झेन रुग्णालयाकडून पैसे दिले जातात. मॅक्स कंपनी कामगारांना कंत्राटी पद्धतीने मासिक पगार देते. मात्र नोटबंदीनंतर दहा डिसेंबरेला येथील ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना मासिक पगारामध्ये एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा देण्यात आल्या.

ज्या कामगारांना तातडीने गरज होती, त्यांना जुन्या नोटा देण्यात आल्या. बावीस जणांना वेतनामध्ये नव्या नोटाही देण्यात आल्या आहेत, असे मॅक्सचे प्रोपरायटर नीलेश हडसे यांनी सांगितले. कामगारांना आम्ही बँकेत खातीही उघडून देत आहोत, सगळीकडेच कॅशची अडचण असल्याने काहीजणांना जुन्या नोटा देण्यात आल्या. या नोटांमुळे काही अडचण येत असेल, तर त्या बदलून देण्याची तयारी नीलेश हडसे यांनी ‘मटा’शी बोलताना दर्शवली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *