facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / कर्जतला अवकाळी पाऊस

कर्जतला अवकाळी पाऊस

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – कर्जतसह तालुक्यात बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. बुधवारी सकाळपासून थंडी गायब होऊन अकाशात ढग जमा झाले होते. यामुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. सकाळी दहाच्या सुमारास कर्जत शहरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. कर्जत तालुक्यात दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. शहरात डांबरी रस्त्यांवर पाणी साचले होते. शहरातील मातीच्या रस्त्यावर पावसाने चिखल झाला होता.

सांयकाळी पुन्हा हवेत गारवा निर्माण होऊन थंडी जाणवू लागली होती. वातावरणात अचानक होणाऱ्या बदलामुळे अनेक जण आजारी पडले आहेत.

यंदा तालुक्यात रब्बी ज्वारी, गहू, हरभरा यांची विक्रमी पेरणी झाली आहे. परतीचा पाऊस चांगला झाल्याने विहिरींना पाणी आहे. या शिवाय वीजपुरवठा सुरळीत असल्याने पिकांना नियमित पाणी मिळत आहे. यामुळे पिकांना उगवण चांगली आहे. ज्वारी, गहू आणि हरभरा आणि तूर याचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. तुरीची काढणी सुरू झाली आहे. अनेकांनी रानात तूर करण्यासाठी काढली आहे; मात्र, या पावसाने तूर भिजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काही जणांनी वातावरणातील बदल लक्षात घेऊन अभ्रकाचा कागद टाकून मका व तूर झाकून ठेवल्यामुळे त्यांचे नुकसान झाले नाही.

या पावसाने ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकांचे नुकसान होणार आहे. जिराईत भागात ज्वारीच्या पिकांना पाण्याची गरज असली तरी हा पाऊस भरणे होण्याएवढा पडला नाही, यामुळे बदललेले वातावरण हरभरा पिकासाठी नुकसानकारक आहे. फळबागांमध्ये डाळींब, द्राक्ष व इतर फळांसाठीदेखील हा पाऊस नुकसानकारक ठरू शकतो.

शेतकऱ्यांना नेहमी लहरी निसर्गाचा फटका सहन करावा लागतो. चांगले उत्पादन असताना अनेक वेळा निसर्ग बदलतो व काही क्षणात होत्याचे नव्हते करून टाकतो. यामुळे सरकराने सर्व पिकांसाठी पीक विमा योजना सुरू केली आहे; मात्र, आजही पीक विमा केवळ ठराविक वेळीच काढला जात आहे. यामध्येही पेरणी केल्यावर पाऊस न पडल्याने हमखास नुकसान होणार असेल तरच विमा उतरवतात; मात्र, ही मानसिकता आत बळीराजाने बदलण्याची गरज आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *