facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / कलाकारांना ‘वस्त्रोद्योग’तर्फे ओळखपत्र

कलाकारांना ‘वस्त्रोद्योग’तर्फे ओळखपत्र

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – मूर्तीकार, शिल्पकार, सोने-चांदीचे कारागीर, छायाचित्रकार, पेंटर, अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणारे कलाकार व हस्त कारागिरांचा मेळावा नुकताच पार पडला. उपस्थित असणाऱ्या कलाकारांना खासदार दिलीप गांधी व वस्त्रोद्योग मंत्रालयाचे संचालक राजेंद्र सिंग यांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. खासदार गांधी यांनी सांगितले की, ‘कलाकारांचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर नेण्यासाठी व सर्व सरकारी योजनांचा त्यांना थेट लाभ मिळावा, यासाठी वस्त्रोद्योग व हस्तकला मंत्रालयाच्यावतीने त्यांना विशेष ओळखपत्र दिले जातेय. त्यामुळे त्यांच्या कलेची नोंद राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणार आहे. राजेंद्र सिंग म्हणाले की, ‘वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत कलाकारांची नोंदणी करुन त्यांना विशेष ओळखपत्र प्रदान करण्याचा उपक्रम सुरु आहे. यामुळे कलाकारांच्या कलेची नोंद सरकारी स्तरावर होईल. या नोंदीमुळे त्यांच्या कलेचे राष्ट्रीयस्तरावर मार्केटींग होईल. कलाकारांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मेळाव्यामध्ये थेट सहभागी होता येईल.’ उपमहापौर श्रीपाद छिंदम, शिल्पकार प्रमोद कांबळे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा गितांजली काळे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, शहर चिटणीस किशोर बोरा, अर्बन बँक संचालक दीपक गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हस्तकला संवर्धन अधिकारी के.सी.साहू यांनी केले तर आभार किशोर बोरा यांनी मानले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *