facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / घरबसल्या करा कॅशलेस व्यवहार!

घरबसल्या करा कॅशलेस व्यवहार!

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – तुमच्याकडे साधा फोन आहे. गावात इंटरनेट कनेक्शनचा संबंध नाही. तरीही चितेंचे कारण नाही. तुम्ही आपापसात कॅशलेस ट्रॅन्झॅक्शन सहजपणे करू शकतात. साधा मोबाइल फोन वापरणारे यूएसएसडी कोडद्वारे तर मोबाइल न वापरणारे बँकेत दिलेल्या आधारकार्ड क्रमांकाच्या मदतीने आपापसात पाच हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार कसे करू शकतात याचा वर्गच जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी भरला. महा ई-सेवा केंद्र चालकांनी कॅशलेस व्यवहार शिकावे आणि इतरांनाही शिकवावेत, असे आवाहन प्रशिक्षणाद्वार करण्यात आले.

रजिर्स्ट मोबाइल क्रमांकावरून महा इ सेवा केंद्रांकडील मायक्रो एटीएम सेंटर्सच्या मदतीने कॅशलेस ट्रान्झॅक्शन करणे शक्य असल्याने त्याबाबतचे प्रशिक्षण जिल्हाभरातील महा ई-सेवा केंद्रांच्या चालकांना बुधवारी देण्यात आले. जिल्हाभरात प्रत्येक २० किलोमीटरच्या आत असे इ-सेवा केंद्र आहेत. त्यामुळे गावात एटीएम सेंटर किंवा बँक नसेल तरीही असे व्यवहार करणे शक्य होणार आहे. येत्या काळात दैनंदिन व्यवहारांसाठी इ-बँकिंग किंवा मोबाइल बँकिंगचा वापर अधिक प्रमाणात होणार असल्याने महा ई-सेवे कंद्राच्या प्रतिनिधींनी कॅशलेस व्यवहाराविषयी माहिती घेऊन ती इतरांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन या प्रशिक्षण सत्राच्या निमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले. कार्यशाळेत महा ई-सेवा केंद्र व सीएससीच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) शशीकांत मंगरुळे, तहसीलदार सी. एस. देशमुख, ‘सीएससी’चे स्टेट हेड समीर पाटील, ई-गव्हर्नन्सचे जिल्हा व्यवस्थापक चेतन सोनजे आदी उपस्थित होते. यावेळी सोनजे यांनी विविध मोबाइल अॅपचा कॅशलेस व्यवहारांसाठी उपयोग करण्याबाबत तसेच ई-बँकिंग आणि मोबाइल बँ‌किंगचा उपयोग करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबतही माहिती देण्यात आली.

नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर अनेकांमध्ये कॅशलेसबाबत प्रश्न आहे. मात्र, या व्यवहारामुळे पैसा सुरक्षित राहतो आणि दैनंदिन चलनातील अनेक अडचणी टाळता येतात. या नव्या प्रणालीमुळे व्यवहारात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. महा ई-सेवा केंद्रांनी या प्रणालीचा प्रचार व प्रसार करावा.
– रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *