facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / त्याने जिंकली कॅन्सरशी लढाई

त्याने जिंकली कॅन्सरशी लढाई

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – बिहारमधील रितेश कुमारला वयाच्या दहाव्या वर्षी कॅन्सरचे निदान झाले… त्यातच चुकीचे उपचार झाल्याने गुंतागुंत वाढली. त्याच्या कुटुंबियांनी मुंबईत टाटा कॅन्सर रुग्णालयात धाव घेतली… सलग दोन वर्षे उपचारानंतर रितेश कॅन्सरमुक्त झाला. आणि आजच्या घडीला तो केईएमच्या मेडिकल कॉलेजमध्ये एमबी‌बीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. कॅन्सरशी लढाई जिंकल्यावर त्याला आता कॅन्सरतज्ज्ञ होऊन रुग्णांवर उपचार करायचे आहेत.

अनेक मुले यावेळी उपस्थ‌ति होती. यावेळी टा‌इम्स नेटवर्कचे एमडी व ‌सीईओ एम. के. आनंद, टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजन बडवे, डॉ. अनिल डिक्रूज आदी उपस्थ‌ति होते.

कॅन्सरविरोधातील जनजागृती अभियानासाठी आमचा नेहमीच पाठिंबा राहिल, असे आश्वासन टाइम्स नेटवर्कचे एमडी व सीईओ आनंद यांनी दिले.

८० टक्के कॅन्सर बरा होतो!

लहान मुलांना कॅन्सर होत नाही असा समाजात गैरसमज आहे. पण लहान मुलांमधील ८० टक्के कॅन्सर बरा होतो. मात्र त्यासाठी वेळेवर निदान होणे गरजेचे आहे, असे टाटा रुग्णालयातील लहान मुलांचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली म्हणाले. तर धूम्रपान, तंबाखूसेवन, अतिमद्यपान व लठ्ठपणा यांपासून लांब राहिले, तर कॅन्सरला सत्तर टक्के प्रतिबंध करता येतो, असे डॉ. राजन बडवे म्हणाले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *