facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / दहा कोटींचे घबाड हाती

दहा कोटींचे घबाड हाती

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – सर्वसामान्यांना नोटाबंदीच्या झळा बसत असताना, पुण्यामध्ये प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांत कोट्यवधी रुपयांचे घबाड हाती आले आहे. पर्वती येथील बॅँकेच्या लॉकरमधून बुधवारी सुमारे दहा कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या असून, तेथील कारवाई अजूनही सुरूच आहे. याच दरम्यान एका खासगी बॅँकेच्या नऊ शाखांवरही पुण्यात छापे टाकण्यात आल्या आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील एका प्रसिद्ध जवाहिऱ्यावरही छापा घालण्यात आला असून, त्यामध्ये तब्बल ४५ कोटी रुपयांचे व्यवहार संशयास्पद आढळले आहेत.
एकीकडे मोठ्या प्रमाणावर रोकडटंचाई असताना विविध शहरांतील छाप्यांत नव्या नोटा आढळून आल्याने या नवीन नोटा त्यांच्यापर्यंत कशा जातात याचीही चर्चा आहे. पुण्यामध्ये सोमवारपासून प्राप्तिकर विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून, त्यात उघडकीस आलेल्या प्रकरणांची माहिती बुधवारी वरिष्ठ सूत्रांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.

त्यांच्या माहितीनुसार, ‘बॅँक ऑफ महाराष्ट्र’च्या पर्वती शाखेतील दोन लॉकरमधून अडीच कोटींच्या शंभर रुपयांच्या, तर उर्वरीत दोन हजारच्या अशी दहा कोटी रुपयांची रोकड हातात आली आहे. अमेरिकेत मुख्यालय असलेल्या एका कंपनीच्या मालकीचे हे लॉकर असून, या कंपनीचे याच शाखेत पंधरा लॉकर आहेत. त्यांतील दोन लॉकर उघडून त्यातील रोकड ताब्यात घेण्यात आली असून, उर्वरित तेरा लॉकरची तपासणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्याला आणखी एक दिवस लागण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून ही कारवाई सुरू आहे.

या बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये आहे. आशिया प्रशांत क्षेत्रासाठीचे मुख्यालय पुण्यात आहे. कंपनीचे पूर्वीपासूनच बँकेच्या पर्वती शाखेत खाते आहे. काही महिन्यांपूर्वीच कंपनीने १५ लॉकर घेतले होते. कंपनीतर्फे एकच व्यक्ती हे लॉकर वापरत होता. नोटाबंदीच्या निर्णयानंतर विशिष्ट लॉकर अनेक वेळा उघडण्यात आले. ‘संबंधित कंपनीने ही रक्कम कशी व कोठून मिळवली, यात बँक कर्मचाऱ्यांचा संबंध आहे का, याची चौकशी करण्यात येईल,’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, संबंधित कंपनीचे बँकेत अनेक वर्षांपासून करंट खाते असून, त्यांना नोटाबंदीनंतर बँकेतर्फे फक्त दोनदा प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात आले होते. लॉकरमध्ये काय ठेवले जाते, यावर बँकेचे नियंत्रण नसते. त्यामुळे या लॉकरमध्ये सापडलेल्या रकमेशी बँकेचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा बँकेच्या वरिष्ठ सूत्रांनी केला.

एका खासगी बँकेच्या पुण्यातील नऊ शाखांवर गेल्या दोन दिवसांत प्राप्तिकर खात्याने छापे घातल्याचे सूत्रांनी सांगितले. बॅँकांकडे येणारी रोख रक्कम खातेदारांना न देता, परस्पर काही जणांना बदलून दिली जात असल्याचा संशय आहे. कारवाईचा तपशील जाहीर केला नाही. भांडारकर रस्त्यावरील शाखेमध्ये सकाळी कारवाई सुरू झाली.

नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर सोने व मौल्यवान रत्नांची खरेदी चढ्या भावाने केल्याच्या संशयावरून, लक्ष्मी रस्ता व पौड रस्ता येथे शाखा असलेल्या जवाहिऱ्याच्या दुकानावर प्राप्तिकरने छापा घातला. या दुकानामधून ४५ कोटीहून अधिक किमतीच्या सोन्याची, तसेच हिऱ्यांची विक्री झाल्याचे आढळून आले आहे.

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *