facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / नाटकातून उलगडला भवरलाल जैन यांचा जीवनपट

नाटकातून उलगडला भवरलाल जैन यांचा जीवनपट

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – वाकोदसारख्या छोट्या खेड्यातील मुलगा ते विश्वविख्यात जैन उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष असे जीवनकार्याचे अत्यंत प्रभावी सादरीकरण अनुभूती निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भवरलाल जैन यांचे जीवन उलगडून दाखविले. या सादरीकरणाने अनुभूती स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक मंत्रमुग्ध झाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुभूती शाळेचा स्थापनादिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. निष्णात हृदयरोगतज्ज्ञ तथा भवरलाल जैन यांचे मित्र डॉ. सुशील मुन्शी यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलनाने औपचारिक उद््घाटन झाले. दलुभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक डॉ. एच. पी. सिंग, गिमी फरहाद, कविवर्य ना. धों. महानोर, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन, प्राचार्य जे. पी. राव उपस्थित होते. भवरलाल जैन यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रेरणादायी प्रसंग घेऊन हर्षल पाटील यांच्या संकल्पनेतून, लेखन व दिग्दर्शनातून त्यांचे जीवन नाटकात यथार्थ साकारले होते. या नाटकाचे वैशिष्ट्य असे की यात ३१८ विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग होता. विशेषतः विद्यार्थ्यांनी अप्रतिम अभिनय केलेला बघायला मिळाला. सर्वच विद्यार्थ्यांनी दमदार अभिनय केला आहे. विशेषतः राधिका राठी (गौराबाईंची भूमिका), नीरज गिरी (दलिचंद जैन), दर्शन चोरडिया (भवरलाल जैन), शुभम अग्रवाल (राणीदानजी जैन), तनु कांकरिया (कांताबाई) यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *