facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / बेकायदेशीर वसुलीविरोधातमनसेचा मोर्चा

बेकायदेशीर वसुलीविरोधातमनसेचा मोर्चा

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – कर्जाच्या वसुलीसाठी खासगी फायनान्स कंपन्या, बँका व पतसंस्थांकडून दमदाटी व जबरदस्तीने केली जात असलेल्या बेकायदेशीर वसुलीला आळा घालून पिडीतांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांना बुधवारी देण्यात आले. दरम्यान, नोटाबंदीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत एकही हप्ता भरला जाणार नाही, असा इशारा यावेळी सेनेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. स्वाती शिंदे व प्रदेश पदाधिकारी संदीप मोझर यांनी यावेळी दिला.

बचत गटांच्या कर्जदार महिलांना खासगी फायनान्स कंपन्या, बँका, पतसंस्थांकडून महिला वर्गाची होणारी पिळवणूक थांबवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचवतीने प्रांताधिकारी कार्यालयावर स्वाती शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेला मोर्चा प्रमुख मार्गावरुन प्रांत कार्यालय येथे आला असता त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी विविध मान्यवरांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले.

महिला बचत गटांना खासगी फायनान्स कंपन्या, विविध बँका व पतसंस्था यांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाते. परंतु सध्या ५०० व १००० रुपयाच्या नोटा बंदींमुळे व सध्या यंत्रमाग व्यवसायात निर्माण झालेली मंदी आणि चलन तुटवडा यामुळे बचत गटांना हप्ता भरणे अडचणीचे ठरत आहे. पण ही बाब लक्षात न घेता फायनान्स कंपन्या व बँकांचे अधिकारी दमदाटी करून व अपरात्री कर्ज वसुलीसाठी येतात. हप्त्यापोटी घरातील साहित्य उचलून नेतात. अशा प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही महिलांनी घाबरून गाव सोडले आहे. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व बचत गटातील महिलांची पिळवणूक थांबवण्यासाठी यामध्ये प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कर्जाच्या वसुलीसाठी खासगी फायनान्स कंपन्या, बँका व पतसंस्थांकडून दमदाटी व जबरदस्तीने केली जात असलेल्या बेकायदेशीर वसुलीला आळा घालून पिडीतांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांना बुधवारी देण्यात आले. दरम्यान, नोटाबंदीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत एकही हप्ता भरला जाणार नाही, असा इशारा यावेळी सेनेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. स्वाती शिंदे व प्रदेश पदाधिकारी संदीप मोझर यांनी यावेळी दिला.

बचत गटांच्या कर्जदार महिलांना खासगी फायनान्स कंपन्या, बँका, पतसंस्थांकडून महिला वर्गाची होणारी पिळवणूक थांबवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचवतीने प्रांताधिकारी कार्यालयावर स्वाती शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेला मोर्चा प्रमुख मार्गावरुन प्रांत कार्यालय येथे आला असता त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी विविध मान्यवरांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले.

महिला बचत गटांना खासगी फायनान्स कंपन्या, विविध बँका व पतसंस्था यांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाते. परंतु सध्या ५०० व १००० रुपयाच्या नोटा बंदींमुळे व सध्या यंत्रमाग व्यवसायात निर्माण झालेली मंदी आणि चलन तुटवडा यामुळे बचत गटांना हप्ता भरणे अडचणीचे ठरत आहे. पण ही बाब लक्षात न घेता फायनान्स कंपन्या व बँकांचे अधिकारी दमदाटी करून व अपरात्री कर्ज वसुलीसाठी येतात. हप्त्यापोटी घरातील साहित्य उचलून नेतात. अशा प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही महिलांनी घाबरून गाव सोडले आहे. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व बचत गटातील महिलांची पिळवणूक थांबवण्यासाठी यामध्ये प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *