facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / मराठवाड्यात रिमझिम पावसाची हजेरी

मराठवाड्यात रिमझिम पावसाची हजेरी

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, लातूर व जालना जिल्हयातील काही भागात बुधवारी सकाळपासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभर वातावरण ढगाळ राहिल्याने काही भागात सूर्यदर्शन झाले नाही. या पावासामुळे कांदा व द्राक्ष पिकांचे नुकसान झाले तर रब्बीच्या ज्वारी, गह‌ू व हरभऱ्यासाठी हा पाऊस उपयुक्त मानला जात आहे.
तमिळनाडू व आंध्रप्रदेशात कमी दाबाचा पट्टा व चक्रीवादळामुळे मराठवाड्यातील काही भागातील वातावरणात अचानकपणे बदल झालेला आहे. त्याचा परिणाम काही ठिकाणी पाऊस झाला. येत्या दोन दिवसात अशाचस्वरूपाचे वातावरण राहिल असा अंदाज वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे.
जालन्यात सूर्यदर्शन नाही
जालना – जालना शहर आणि ग्रामीण भागात बुधवारी दिवसभर आकाश ढगांनी भरलेल्या अवस्थेत होते. थंड हवा वाहत होती तर सूर्यदर्शन झाले नाही. भर हिवाळयात वा अचानकपणे हवामानात बदल झाला. थंडीचा भार दिवसभर असून आकाशातील ढगामुळे पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जिल्ह्यात कुठेही पाऊस झाल्याचे दिसून आले नाही.

लातूरमध्ये भुरभुर
लातूर – बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. लातूरात पहाटे भुरभुर पाऊसही पडला. औसा शहर व परिसरात सकाळी काही ठिकाणी हलका पाऊस झाला. जिल्ह्यात कुठेही सूर्यदर्शन झाले नाही. अहमदपूरला ढगाळ वातावरण हाते. जिल्ह्यात सर्वत्र ऐन हिवाळयात एकदंरीतच पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.

रिमझीम पाऊस
उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात बुधवारी सकाळपासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभर सर्वत्र ढगाळ वातावारण होते. त्यामुळे थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत होती. या पावासामुळे कांदा व द्राक्ष पिकांचे नुकसान झाले तर रब्बीच्या ज्वारी, गह‌ू व हरभऱ्यासाठी हा पाऊस उपयुक्त मानला जात असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून ऐकावयास मिळते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *