facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी हिवाळा विशेष गाड्या

रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी हिवाळा विशेष गाड्या

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे-जबलपूर, पुणे-करमली (गोवा) आणि पुणे-मेंगळुरू (कर्नाटक) या मार्गांवर हिवाळा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज, गुरुवारपासून या गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग सुरू होणार आहे.
पुणे-जबलपुर (गाडी क्र. ०१६५५) गाडी तीन जानेवारी ते २८ मार्च २०१७ या कालावधीत धावणार आहे. ही गाडी दर मंगळवारी पुणे स्टेशनवरून सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुटेल. जबलपूर-पुणे (गाडी क्र. ०१६५६) ही गाडी जबलपूरवरून सकाळी नऊ वाजता निघून दुसऱ्या दिवळी सकाळी चार वाजता पुणे स्टेशनला पोहोचेल. ही गाडी प्रत्येकी १३ फेऱ्या करणार आहे. या गाडीला दौंड, नगर, कोपरगाव, मनमाड, भूसावळ, खांडवा, हरदा, इटारसी, पिपरीया,नरसिंगपूर आणि व मदन महाल असे थांबे देण्यात आले आहेत.
पुणे-करमली (गाडी क्र. ०१४०९) गाडी १५ डिसेंबर २०१६ ते १२ जानेवारी २०१७ या दरम्यान धावणार आहे. ही गाडी दर गुरुवारी पुणे स्टेशनवरून रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुटेल. ही गाडी ५ फेऱ्या करणार आहे. करमली-पुणे (गाडी क्र. ०१४१०) गाडी दर शुक्रवारी दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी निघणार आहे. ही गाडी पाच फेऱ्या करणार आहे. दरम्यान, या गाडीला लोणावळा, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि टिवीम हे थांबे देण्यात आले आहेत.
पुणे-मेंगळुरू (गाडी क्र. ०१३०१) ही गाडी १७ डिसेंबर २०१६ ते १४ जानेवारी २०१७ या कालावधीत धावणार असून, ती दर शनिवारी चार वाजून १० मिनिटांनी पुणे स्टेशनवरून सुटेल. मेंगळुरू-पुणे (गाडी क्र. ०१३१०) गाडी दर रविवारी रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी मेंगळुरूहून निघेल. ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमली, मडगाव, कारवार, मुलकी आणि टोकूर येथे थांबणार आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *