facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / वक्तही तो नही है हमारे पास!

वक्तही तो नही है हमारे पास!

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – शतकातील महानायक.. हिंदी सिनेसृष्टीचा बेताज बादशाह म्हणून निर्विवाद नाव समोर येते ते महानायक अमिताभ बच्चन यांचे. पंच्याहत्तरीच्या उंबरठ्यावर असलेला हा अष्टपैलू नायक आजही अपार व्यग्र आहे. पण बुधवारी मात्र या बिग बींनी लाखो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. मंगळवारी मध्यरात्री ब्लॉग लिहिताना हाती असलेली कामे आणि आपल्या ओंजळीतून दिवसागणिक कमी होत जाणाऱ्या काळाची आठवण त्यांनी करून दिली.

ते म्हणतात, ‘मी सध्या बऱ्याच नव्या कल्पना, सिनेमाच्या गोष्टींच्या चर्चेत भाग घेतो. तासन्‍तास यांच्या चर्चा होतात. सिनेमा, टीव्ही, आत्मचरित्र असे बरेच काही यात असते. हे सर्व मी ऐकतो. यापैकी अनेकांवर भविष्यात सिनेमे होऊ शकतात. त्यापैकी मी अगदी मोजक्या निवडल्या, तरी पुढे आयुष्यभर काम करण्यासाठी त्या मला पुरेशा पडतील,’ असे ते नमूद करतात. ते पुढे लिहितात, ‘मनुष्याचा इच्छांना वेसण घालणे कठीण आहे. आपल्याला एकाच वेळी समोर आलेल्या अनेक गोष्टी करण्याचा मोह होतोही. पण .. वेळ माझ्याबाजूची नाहीय म्हणूनच स्वीकारलेले मोजके काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे माझा कल असतो आणि इथेच मुख्य अडचण आहे,’ असे त्यांनी लिहिले आहे. अमिताभ यांनी येथे काळाचा दाखला देत ‘तो आपल्या बाजूने नाही,’ असे सांगितल्याने बिग बीच्या चाहत्यांच्या पोटात एकदम गोळा आला आहे.

हा ब्लॉग लिहिताना त्यांनी एका कलेंडरसाठी काढलेला फोटोही पोस्ट केला आहे. भूतकाळाच्या आठवणीतून आणि सध्या कमालीच्या कोंडीत असलेल्या वातावरणापासून मला लांब जायचे आहे, असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *