facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / वीरपत्नी तुपारे यांना शौर्यपदक

वीरपत्नी तुपारे यांना शौर्यपदक

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील वीरमरण आलेल्या जवानांच्या वीरपत्नींचा व नातेवाईकांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील शहीद राजेंद्र तुपारे यांच्या वीरपत्नी शर्मिला, आई शांता तुपारे, वडील नारायण वैजू तुपारे आणि भाऊ संदीप यांना शौर्यपदक देवून गौरविण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पाकिस्तानच्या भ्याड हल्याला घाबरुन सैनिकांत भरती होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. ते प्रमाण देशसेवेसाठी दुप्पटीने वाढले आहे. ही देशासाठी व राज्यासाठी भूषणावह बाब आहे. जवानांना आलेले वीरमरण हे एकट्या कुटुंबाचे नाही तर त्यांच्यापाठीमागे सारा देश उभा आहे.’ यावेळी राजेंद्र तुपारे यांच्या नातेवाईकांना आठ लाखांचा निधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी शहीद व युध्दात अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या वीरपत्नींचा आणि नातेवाईकांचा शौर्यपदक देवून सत्कार झाला. यावेळी सैनिक कल्याण विभागाचे पदाधिकारी, शहिद जवानांच्या वीरपत्नी तसेच जिल्हा सैनिक संघटक दिपक शेळके, राज्याचे सैनिक विभाग संचालक कर्नल सुहास जतकर, कार्वेचे उपसरपंच शिवाजी तुपारे यांच्यासह सैनिक उपस्थित होते.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *