facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / नागपूर / आजपासून बहुरंगी मेजवानी

आजपासून बहुरंगी मेजवानी

विविध गाण्यांसह ‘सूर निरागस हो’मुळे मराठी मनामनांत पोहोचलेले ‘ब्रेथलेस’ गायक शंकर महादेवन आणि लेखक, दिग्दर्शक, निर्माता, गायक, अभिनेता अशी अष्टपैलू कामगिरी करणारा ‘रॉकस्टार’ फरहान अख्तर या दोन दिग्गजांची भेट घेण्याची संधी साधण्यास नागपूरकरांना काहीच क्षण वाट पाहावी लागणार आहे. आज, शुक्रवारपासून महापालिकेचा ‘नागपूर महोत्सव’ सुरू होणार असून, हे दोघे दिग्गज प्रमुख आकर्षण आहेत.

नागपूर महापालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या संयुक्तवतीने शुक्रवार, १६ ते सोमवार, १९ डिसेंबरदरम्यान यशवंत स्टेडियम, धंतोली येथे नागपूरकरांसाठी बहुरंगी सांस्कृतिक मेजवानी देणारा ‘नागपूर महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

नागपूर महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती राहील. रोजगार हमी व पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके राहतील. महोत्सवाची सुरुवात अशोक हांडे रचित महानाट्य ‘आजादी ७०’ या भारतीय स्वातंत्र्याची संगीतमय गाथा सांगणाऱ्या कार्यक्रमाने होणार आहे. ‘थुकरटवाडी’त कॉमेडीची धम्माल करणारे डॉ. नीलेश साबळे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, भाऊ कदम, श्रेया बुगडे यांची चमू नागपूरकरांना हसवायला १७ तारखेला येणार आहे. नाटक, नृत्य व विनोदांनी हाउसफुल्ल असलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा रंगतदार कार्यक्रम नागपूरकरांसाठी खास आकर्षण राहणार आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे १८ तारखेला प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांची ‘कट्यार टू कजरारे’ ही लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे. तर १९ तारखेला फरहान अख्तरच्या गायकीचा आनंद घेता येणार आहे.

नागपूर महोत्सव

स्थळ : यशवंत स्टेडीयम

वेळ : सायंकाळी ६ वाजता

१६ डिसेंबर : महोत्सवाचे उद्घाटन, अशोक हांडे रचित महानाट्य ‘आजादी ७०’

१७ डिसेंबर : चला हवा येऊ द्या

१८ डिसेंबर : शंकर महादेवन यांचा ‘कट्यार टू कजरारे’

१९ डिसेंबर : रॉकस्टार फरहान अख्तर

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *