facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / नाशिक / कॅशलेस जुगाराला चाप!

कॅशलेस जुगाराला चाप!

नोटाबंदीनंतर कॅशलेस सोसायटीचे वारे जोमात वाहत आहे. कुठे ऑनलाइन पेमेंट, तर कुठे मोबाइल बँकिंगचा जोर. क्रेडिट किंवा डेबिट कार्डाचा वापर सर्रास होताना दिसतो. नोटाबंदीमुळे जुगार खेळणारे, बेटिंग करणाऱ्यांना चाप बसला. यावर पर्याय म्हणून या महाभागांनी क्रेडिट कार्डाचा वापर सुरू केला. ही बाब लक्षात घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा व्यवहारांना क्रेडिट कार्डाचा वापर करता येणार नाही, असा आदेश दिला आहे. एवढेच नव्हे, तर असे निदर्शनास आल्यास संबंधित कार्ड लागलीच बंद करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयाने काय फरक पडला, यावर सध्या बराच खल सुरू आहे. सर्वसामान्य व्यक्ती आपआपल्या परीने आर्थिक किल्ला लढवताना दिसतात. यात, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारे दोन नंबरचे धंदेही सापडलेत. कॅसिनो, लॉटरी, अनधिकृत कॉल बॅक सिस्टिम तसेच बंदी असलेली मासिके खरेदी यांच्या व्यवहारात मंदी आली. शेवटी या व्यावसायिकांनी ऑनलाइन प्रणालीचा पर्याय निवडला. विशेषतः क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून रोज कोट्यवधींचे व्यवहार पार पडत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निर्दशनास आले आहे. अनधिकृत व्यवहारांना याद्वारे प्रोत्साहन मिळत असून, ही बाब घातक असल्याने अशा व्यवहारांना पायबंद घालण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. याबाबत बँक व्यवस्थापनांना रिझर्व्ह बँकेने आदेश दिले आहेत.

यापुढे क्रेडिट कार्डवर लॉटरी तिकिटे खरेदी करता येणार नाहीत, तसेच कॉल बॅक सर्व्हिस, बेटिंग किंवा जुगाराबाबत इतर व्यवहारही करता येणार नाहीत. एवढेच नव्हे, तर देशात बंदी असलेल्या मासिकांची खरेदीसुद्धा क्रेडिट कार्डाद्वारे करता येणार नाही. देशातील अनेक मोठ्या कसिनो, हॉटेल्समध्ये हे उद्योग चालतात. वेबसाइटच्या मदतीने खरेदीप्रक्रिया पार पाडली जाते.

…तर कार्ड कायमस्वरूपी ब्लॉक

फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट १९९९ (फेमा)मधील तरतुदीनुसार क्रेडिट कार्डधारकास प्रतिबंधित व्यवहार करण्यास मनाई असल्याने रिझर्व्ह बँकेने हे आदेश दिले असल्याचे राष्ट्रीयीकृत बँकेतील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित कार्ड लागलीच बंद करण्यात येईल, तसेच वापरकर्त्याला पुन्हा क्रेडिट कार्ड दिले जाणार नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हे टाळावेच लागेल!

– क्रेडिट कार्डावर लॉटरी तिकीट खरेदी
– बंदी असलेली मासिकांची खरेदी
– कसिनोत क्रेडिट कार्डचा वापर

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *