facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / घोटाळ्यातील बँक कर्मचारी फरार

घोटाळ्यातील बँक कर्मचारी फरार

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – बेकायदेशीरपणे लाखोंच्या नोटा बदलून देणारा स्टेट बँकेचा कर्मचारी चंद्रकांत मल्लू चव्हाण (वय ३७, रा. शांतीनगर, उचगाव) हा फरार झाला आहे. शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी (ता. १५) चव्हाण याच्या घराची झडती घेतली, मात्र तो पत्नीसह तिरुपती येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चव्हाण याने कोणत्या खात्यांवरून संशयास्पद रक्कम दिली आहे याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी बँकेच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.

केंद्र सरकारने एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर नवीन दोन हजार रुपयांच्या नोटा देण्यासाठी बँकांना नियमावली बंधनकारक केली होती. प्रत्येक खातेदाराला केवळ चार हजार रुपयांचीच रक्कम देण्याचे आदेश दिले होते. रक्कम देताना संबंधित ग्राहकांचे ओळखपत्र घेणे सक्तीचे केले आहे. शहरातील मार्केट यार्ड परिसरातील स्टेट बँकेत मात्र केवायसीचा नियम डावलून मोठ्या प्रमाणात रक्कम वितरित झाली. बँक मॅनेजर धनंजय महादेव अभ्यंकर यांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी संपूर्ण व्यवहारांची पडताळणी केली. कर्मचारी चंद्रकांत चव्हाण याने नियम डावलून ६ लाख ९२ हजार रुपयांची रक्कम ग्राहकांना दिली असल्याचे स्पष्ट झाले. अभ्यंकर यांनी याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात चव्हाण याच्याविरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर शहरात खळबळ निर्माण झाली होती.

पोलिसांनी गुरुवारी चव्हाण याच्या उचगावमधील घराची झडती घेतली. यावेळी त्याची आई घरात होती. आईकडे केलेल्या चौकशीत चंद्रकांत चव्हाण त्याच्या पत्नीसह तिरुपतीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, चव्हाण याच्या मोबाइलवरून लोकेशनचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा निरोप दिला आहे, मात्र यानंतरही त्याने हजर होण्यास टाळाटाळ केल्यास त्याच्या अटकेसाठी पथके रवाना होणार आहेत. चव्हाण याने नवीन नोटा नेमक्या कोणाला दिल्या याचा शोध घेण्यासाठी बँकेतील कागदपत्रांची तपासणी सुरू असून, चव्हाण याला ताब्यात घेतल्यानंतरच ही रक्कम कोणाला दिली याचे रहस्य समोर येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी दिली.

बँकिंग क्षेत्रात खळबळ

बँकेच्या कर्मचाऱ्याकडूनच नियम डावलून नव्या नोटांचे वितरण झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने गुरुवारी शहरातील सर्वच बँकांमध्ये या घटनेची चर्चा सुरू होती. इतर बँकांच्या अधिकाऱ्यांनी व्यवहारांची तपासणी सुरू केली असून, संशयास्पद व्यवहार आणि कर्मचाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. यातच गांधीनगरमधील पाच व्यक्तींना नव्या नोटांसह रत्नागिरी जिल्ह्यात अटक झाल्याने त्यांच्याकडील नोटा कोल्हापुरातूनच वितरित झाल्या आहेत का? याचीही चर्चा सुरू आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *