facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / त्यांनी आपली लायकी पहावी

त्यांनी आपली लायकी पहावी

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आधी आपली लायकी तपासून पहावी, मी तोंड उघडले तर त्यांना घराबाहेर पडणे मुश्कील होणार असून येथून पुढील काळात त्यांना मी सुट्टी देणार नाही, अशी खरमरीत टीका केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड व सुभाष घोडके यांच्यावर केली.

संस्कार भवन येथे जगदंबा विकास आघाडीच्या वतीने आभार मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, महिला अध्यक्षा मनीषा डांबे, जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वला शिरसाठ, समितीचे उपाध्यक्ष विष्णू सातपुते, बंडू बोरुडे, गहिनीनाथ शिरसाठ, चांद मणियार, माऊली केळगंद्रे, दिगंबर गाडे, बबन बोरुडे, डॉ. राजेंद्र खेडकर, रत्नमाला उदमले, वैभव दहिफळे आदी या वेळी उपस्थित होते. पालिका निवडणुकीत विजयी व पराभूत झालेल्या उमेदवारांचा या वेळी गौरव करण्यात आला.

ढाकणे म्हणाले, व्यक्तिगत पातळीवर मी कधी कोणावर टीका केली नाही. संस्कार पाळणारा मी कार्यकर्ता आहे; मात्र, माझ्यावर आव्हाड व घोडके यांच्यासारख्या टिनपाट नेत्यांनी टीका केल्याने मी आता गप्प बसणार नाही. हे नेते स्वतःला वाघ समजतात; मात्र, कासार पिंपळगावला राजळेंकडे गेले की यांच्या शेळ्या होतात. स्वाभिमान गहाण टाकण्याचे काम यांनी केले आहे. मी मदत केली नसती तर त्यांचे प्रपंच सुद्धा उभे राहू शकले नसते, एवढे त्यांचे हात पाय बरबरटलेले आहेत. मी तुम्हाला माणसात ठेवले हा माझा गुन्हा आहे काय, याचा विचार त्यांनी करावा. हे दोघे कुठे चुकले तर माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी त्यांना जाब विचारावा. मला महात्मा व्हायचे नाही; मात्र, माझी सहनशक्ती आता संपली आहे. आव्हाड यांनी केलेला पालिकेतील भ्रष्टाचार आपण पुराव्यानिशी बाहेर काढला. या भ्रष्टाचारामुळे ते पालिका निवडणुकीत उभे राहाण्यासाठी सहा वर्षांकरता अपात्र होणार होते. आव्हाड आजपर्यंत कोणाशीही प्रामाणिक राहीलेले नाहीत. येथून पुढील काळात आपल्या विरोधात बोलाल तर सुट्टी नाही. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. चिन्ह कोणते आहे याचा विचार न करता माझ्या पाठीशी उभे राहा. दोन दिवसांनंतर ग्रामीण भागात आपण फिरणार आहोत. पालिका निवडणुकीतील पराभव हा मतविभागणीमुळे झाला आहे. नव्या नगराध्यक्षांना आपल्या शुभेच्छा आहेत; मात्र, ते चुकल्यास त्यांच्या विरोधातही आवाज उठवू. भाजपने या विजयामुळे स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सीताराम बोरुडे यांनी प्रास्ताविक केले. भारत ढमाळ यांनी सूत्रसंचालन केले. योगेश रासने यांनी आभार मानले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *