facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / मुंबई / दहशतवाद्यांना घरपोच पैसे, देशप्रेमी रांगेत

दहशतवाद्यांना घरपोच पैसे, देशप्रेमी रांगेत

‘जिल्हा बँकांत शेतकऱ्यांचे आणि गरिबांचे पैसे आहेत. या बँकांवर निर्बंध लादून सरकारने काय मिळविले’, अशा शब्दांत संताप व्यक्त करताना उद्योगपती विजय मल्ल्याने जिल्हा बँकेतून कर्ज घेतले होते काय’, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केला. ‘काश्मिरात दहशतवाद्यांना आर्थिक मदत म्हणून घरपोच पैसे पुरविले जात आहेत. पण देशप्रेमींना पैशांसाठी रांगेत उभे रहावे लागत आहे’, असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते हेमराज शहा, जयंतीभाई मोदी आणि भाजपचे गुजराती विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोशी यांच्यासह गुजराती समाजातील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रेवश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जिल्हा बँकांवरील निर्बंध उठविण्याच्या मागणीचा पुनरूच्चार केला. शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकांवर निर्बंध लावून ते पुढे शेतकऱ्यांवर आयकर लावणार आहेत का ते एकदाचे सरकारने जाहीर करावे, असेही ते म्हणाले. अॅक्सिस बँकेचा घोटाळा बाहेर येताच या घोटाळ्याला सरकारने क्लीनचिट दिल्याचेही त्यांनी यावेळी माध्यमांच्या निदर्शनास आणून दिले.

‘गुजराती समाजाने शिवसेनेसोबत आले पाहिजे, असे बाळासाहेबांना नेहमी वाटायचे. मात्र शिवसेनेबद्दल अनेक वेळा जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले गेले. आजपर्यंत गुजराती समाजाचा इतरांनी दुरुपयोग केला गेला. सध्या रांगेत उभे राहणे हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला असला तरी शिवसेनेत मी तुम्हाला रांगेत उभे करणार नाही’ असेही ते म्हणाले.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *