facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / वडिलांवर रोष व्यक्त करून तरुणीची आत्महत्या

वडिलांवर रोष व्यक्त करून तरुणीची आत्महत्या

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव –  जळगाव शहरातील संभाजीनगर साखरवाडीतील एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नागपूर येथून बी. ई. मेकॅनिकल झाल्यानंतर गेट परीक्षेच्या अभ्यासासाठी ही तरुणी आपल्या पालकांसह जळगावात राहत होती. प्राजक्ता शिवशंकर टाकळीकर, असे तिचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने पालकांवर रोष व्यक्त केला आहे.

प्राजक्ताचे वडील शिवशंकर टाकळीकर हे भुसावळला रेल्वेत चालक आहेत. लहान बहीण मुग्धा ही हैदराबादला आयआयटीचे शिक्षण घेत आहेत. भाऊ भावेश दहावीच्या वर्गात आहे. घटना घडली त्यावेळी प्राजक्ताची आई हैदराबादला मुलीकडे गेली होती. प्राजक्ता गेटचा अभ्यास करण्यासाठी घराच्या वरच्या मजल्यावर स्वतंत्र खोलीत राहायची. रात्री उशिरापर्यंत अभ्यास केल्यावर अनेकदा ती सकाळी उशिरा उठत असे. गुरुवारी दुपारपर्यंत प्राजक्ता वरच्या खोलीतून खाली न आल्याने वडिलांनी तिच्या भावाला वर पाठविले. त्याला खिडकीतून प्राजक्ताने गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची माहिती पोलिसांनी कळविण्यात आली. पोलिस आल्यावर मृतदेह खाली उतरविण्यात आला. पोलिसांनी संगणक व प्राजक्ताची कॉलेज बॅग ताब्यात घेतली आहे.

सुसाइड नोट मिळाली

पोलिसांना प्राजक्ताच्या खोलीतून चार पानी सुसाइड नोट मिळाली. त्यात प्राजक्ताने आपल्या आई-वडिलांवर रोष व्यक्त केला आहे. आणखी उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती, मात्र साथ मिळाली नाही. नागपूर येथे शिक्षण घेत असताना ती राहत असलेल्या होस्टेलची परिस्थितीदेखील चांगली नसल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. सुसाइड नोटमधील संपूर्ण माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *