facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / संभाजीराजेची संसदेबाहेर निदर्शने

संभाजीराजेची संसदेबाहेर निदर्शने

संसदेत नोटाबंदीवरून गोंधळ सुरू असल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडता न आल्याने आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी संसदेच्या आवारात आंदोलन केले. मराठा आरक्षणासाठी संसदेच्या आवारात फलक हातात घेऊन लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन मराठा समाजाच्या मागणीकडे तातडीने लक्ष देण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले.

नागपूर विधीमंडळावर काढलेल्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी हातात फलक आणि डोक्यावर मराठा आरक्षणाचा उल्लेख असणारी टोपी घालून गुरुवारी सकाळी संसदेसमोर उभे राहून लक्ष वेधून घेतले. ‘मराठा समाज की यही पुकार, जल्दसे जल्द आरक्षण दे सरकार’, ‘कोपर्डी बलात्कार के अपराधियों को जल्दसे जल्द मृत्यूदंड मिले’ असेही फलक संभाजीराजेंच्या हातात होते. हा प्रश्न संसदेत मांडण्याची इच्छा होती. पण सलग महिनाभर गोंधळ आणि गदारोळामुळे संसद ठप्प असल्याने अखेर सभागृहाबाहेर पण संसद परिसरात अशा पद्धतीने आंदोलन करावे लागले. मराठा आरक्षणाचे जनहिताचे प्रश्न संसदेत मांडता येत नसतील तर संसदेचा उपयोग काय? दिल्लीत फक्त गोंधळ पाहायला यायचे का? अशी प्रतिक्रियाही संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना संभाजीराजे यांनी निवेदन दिले. केंद्रसरकार, राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात मराठा समाज लाखोंच्या संख्यने रस्त्यांवर उतरला आहे. या असंतोषाला उग्र वळण लागण्यापुर्वीच मागणीची गंभीर दखल घेतली पाहिजे असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *