facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / मुंबई / कॅन्सरग्रस्तांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

कॅन्सरग्रस्तांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

कॅन्सरग्रस्त मुलांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी रविवारी टाटा रुग्णालयात सकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदित्य रॉय कपूर, सोनाली बेंद्रे, गणेश आचार्य, अमोल गुप्ते यांनी एकच धमाल केली. आदित्य रॉय कपूरने ‘ओके जानू’ चित्रपटातील ‘हम्मा हम्मा’ या गाण्याची धून वाजवली तेव्हा कॅन्सरग्रस्त मुले काही क्षणांसाठी आपले दुःख विसरून गेली.

कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो! हा संदेश देण्यासाठी टाटा मेमोरिअल रुग्णालय व इम्पॅक्ट फाऊंडेशनच्यावतीने ‘होप’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. बॉलिवुडमधील कलाकारांसोबत माजी खासदार प्रिया दत्त, टाटा रुग्णालयाच्या मेडिकल आँकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद बाणवली आदी उपस्थ‌ति होते. हिंदी गाण्यांवर या सर्वांनी ताल धरला. आदित्य रॉयने गिटार वाजवली तेव्हा तर या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर निर्माण झाली होती. या मुलांनी‌ काढलेल्या छा‌याचित्रांचे प्रदर्शनही यावेळी आयोजित केले होते. या मुलांमधील कलागुण पाहून चित्रपटातील हे कलांवत आश्चर्यचकित झाले. रुग्णालयात उपचार घेऊन कॅन्सरमुक्त झालेल्या मुलांनी पुढे उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिययर, सीए, माहिती तंत्रज्ञन क्षेत्रात नाव कमावले आहे. सध्याच्या उपचार पध्दतीमुळे कॅन्सरवर मात करून आयुर्मान वाढवता येते, असे डॉ. बाणवली म्हणाले.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *