facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / ठिबक वाढूनही अनुदान मिळेना

ठिबक वाढूनही अनुदान मिळेना

आवाज न्यूज नेटवर्क –  

जळगाव – जळगाव जिल्ह्यात शेतकरी दिवसेंदिवस ठिबक योजनेकडे वळत असताना शासनाकडून ठिबक योजनेला मिळणारे अनुदान मात्र, पुरेसे येत नसल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षाचे ४२ कोटींचे अनुदान अद्याप आलेले नाही.

अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी ठिबककडे वळावे म्हणून राज्य शासन आवाहन करत आहे. शेतात ठिबक बसवल्यास त्यापोटी अनुदान देत आहेत. यामुळे शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर ठिबक सिंचनकडे वळत आहेत. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात २८२५५ शेतकऱ्यांनी ठिबक बसवले असून अनुदान मिळण्यासाठी कृषि विभागाकडे प्रस्ताव दाखल केलेले आहेत. मात्र १३ हजारांवर प्रस्तावांचे ४२ कोटींचे अनुदान प्राप्त झालेले नाही. उपलब्ध माहितीनुसार २०१४-१५ या वर्षात कृषि विभागाकडे ठिबकचे ११४६४ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यापैकी ९०४२ प्रस्ताव निकाली काढले गेले. त्यांना ३४ कोटी ७१ लाख रुपयांचे वाटप झालेे. उर्वरिताना ७ कोटी ३३ लाख रूपये देणे बाकी आहे. २०१५-१६ मध्ये १६,७९१ ठिबकचे प्रस्ताव प्राप्त झाले. केवळ ३४५३ प्रस्ताव निकाली निघून त्यांना ११ कोटी ८७ लाख रुपयांचे वाटप झाले. उर्वरिताना ३५ कोटींचे देणे बाकी आहे. २०१६-१७ या वर्षात केवळ ४६४१ प्रस्तावांना पूर्वसंमती मिळाली. ९७४ प्रस्तावांचे ३ कोटी ७७ लाख रूपये वाटप झाले आहे. अनुदान प्राप्तीसाठी मात्र शेतकऱ्यांना वाट पहावी लागत आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *