facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / पालिकांसाठी ७६ टक्के मतदान

पालिकांसाठी ७६ टक्के मतदान

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, खुलताबाद, कन्नड व गंगापूर नगर पालिकांसाठी रविवारी शांततेत पण, उत्साहात मतदान झाले. चारही ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. दुपारी मतदानाचा वेग थोडा मंदावला, पण सायंकाळी पुन्हा एकदा रांगा लागल्या. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
जिल्ह्यातील चार नगर पालिकांमध्ये तिसऱ्या टप्प्यात रविवारी मतदान घेण्यात आले. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार; खुलताबाद पालिकेसाठी ७९.७७ टक्के, पैठण ७५.७३ टक्के, कन्नड ७६.८४ व गंगापूर नगरपालिकेसाठी ७५.५६ टक्के मतदान झाले. या पालिकेसाठी सोमवारी सकाळी दहापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
सध्या गंगापूर व कन्नडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, पैठण व खुलताबादमध्ये शिवसेना-भाजप युती यांची सत्ता आहे. या निवडणुकीत चारही नगरपालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली नाही. पैठणमध्ये शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढले, पण गंगापूर, कन्नड व खुलताबादमध्ये दोन्ही पक्षांची युती झाली आहे. कन्नडमध्ये शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी स्व. रायभान जाधव विकास आघाडी स्थापन करून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. नगराध्यक्षपदासाठी गंगापूरमध्ये तीन व कन्नड सहा महिला उमेदवार, पैठणमध्ये दहा व खुलताबादमध्ये चार पुरूष उमेदवारांमध्ये लढत आहे. या पालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, भाजपचे आमदार प्रशांत बंब, शिवसेना आमदार संदीपान भुमरे व हर्षवर्धन जाधव यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *