facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / मजुरांचे पगार होताहेत उशिरा

मजुरांचे पगार होताहेत उशिरा

आवाज न्यूज नेटवर्क –  

अहमदनगर – रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांचे पगार वेळेवर करण्याचे आदेश जिल्ह्यात कागदावरच राहिले आहेत. कामांचे मस्टर बंद झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत मजुरांच्या खात्यात पगार जमा करणे बंधनकारक असतानाही अधिकाऱ्यांनी मात्र या आदेशाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल १८ कोटी रुपयांचे पगार उशीराने झाले आहेत. पगार वेळेवर करण्यात जिल्हा राज्यातही पिछाडीवर पडला असून जवळपास ६१ टक्के मजुरांचे पगार उशिरा होत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.
रोहयोच्या कामात पारदर्शकता आणून मजुरांचे पगार वेळेवर करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात पगार जमा करणे तसेच या कामात विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांच्याच पगारातून दंड वसूल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतला होता. परंतु, जिल्ह्यात मात्र हा निर्णय अद्यापही व्यवस्थित अमलात आलेला नाही. जिल्ह्यात पगार वेळेवर करण्यात अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा केला जात आहे. कामाचे मस्टर बंद झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत पगार खात्यात जमा होत नाहीत. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नगर जिल्हा या कामात खूपच मागे पडला आहे. राज्यात पगार उशिरा करण्यात पहिल्या दहा जिल्ह्यात नगरचा समावेश झाला आहे. तर पगार वेळेवर करण्याचे प्रमाण अवघे ३९ टक्के राहिले आहे. मस्टर भरण्याचे तसेच इतर कामे ऑनलाइन असतानाही वेळेचे बंधन पाळणे मात्र शक्य झालेले नाही. ऑनलाइनची कामे किचकट असल्याचे कारण पुढे करून पगार उशिरा केले जात आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *