facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / मुंबई / मेडिकल कौन्सिलसाठी २५ टक्के मतदान

मेडिकल कौन्सिलसाठी २५ टक्के मतदान

वैद्यकीय विश्वातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीत राज्यात सुमारे पंचवीस टक्के मतदान झाले. राज्यात डॉक्टरांमध्ये मतदानासाठी उत्साह होता. पण मुंबई शहर व उपनगरांतील डॉक्टर मतदानासाठी उदासीन असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले.

महाराष्ट्र मेडिकल कौन्स‌लिच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशातील वैद्यकीय विश्वाचे लक्ष लागले आहे. कौन्स‌लिच्या नऊ जागांसाठी ४५ उमेदवार ‌‌रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांचा जोरादार प्रचार सुरू होता.

राज्यात सुमारे पंचवीस टक्के मतदान झाले, अशी माहिती महाराष्ट्र मेडिकल कौन्स‌लिचे माजी सदस्य डॉ. सुहास पिंगळे यांनी दिली. मुंबईत ८ हजार मतदारांपैकी १ हजार २७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर उपनगरातील चौदा हजार मतदारांपैकी २ हजार ३०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मुंबईत कमी झालेल्या मतदानाबद्दल डॉ. सुहास पिंगळे यांनी नाराजी व्यक्त केली. डॉक्टरांसारख्या सुशिक्षित मंडळीसाठी ही गोष्ट लांछनास्पद आहे, अशी टीका त्यांनी‌ केली. मुंबईतील ७८ वर्षांचे ज्येष्ठ सर्जन डॉ. पृथ्वी मधोक तसेच ८२ वर्षांच्या ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन डॉ. हंसा गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यातल्या ८४ हजार डॉक्टरांपैकी सुमारे वीस हजार डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजावला.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *