facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / Featured / आगळ्यावेगळ्या प्रयोगांनी वेधले लक्ष

आगळ्यावेगळ्या प्रयोगांनी वेधले लक्ष

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – सर्व शिक्षा अभियानांतर्गत या. दे. पाटील शाळेत आयोजित दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रयोग सादर केले आहेत. या प्रदर्शनात जळगाव तालुक्यातील १९४ शाळांमधील २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

प्रदर्शनाचे उद््घाटन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, पंचायत समितीच्या सभापती हिराबाई मोरे, गट विकास अधिकारी तुषार जाधव, उपशिक्षणाधिकारी डी. एम. देवांग, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी अरुण पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पणा चव्हाण आदी उपस्थित होते.

नंदिनीबाई विद्यालयातील सहावीच्या मिनाक्षी चौधरी या विद्यार्थिनीने प्रदूषणमुक्त शहराची कल्पना आपल्या प्रयोगातून मांडली होती. शंकुतला विद्यालयालयातील विद्यार्थिनींनी हवेच्या दाबाचा प्रयोग मांडला होता. अवैध वाळू उपशामुळे भविष्यात पाणीटंचाईची समस्या जाणवू शकते या समस्येकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. नशिराबाद जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाण्याच्या दाबावर चालणारे जेसीबी या प्रयोगाची मांडणी केली होती. पर्यावरण, शेती या विषयांप्रमाणे वाहतुकीच्या समस्यांवरदेखील प्रयोगाच्या सहाय्याने प्रकाश टाकण्यात आला. वाहतूक कोंडीसाठी जीपीएस, सिग्नल व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत पोस्टरमधून मार्गदर्शन करण्यात आले. जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौर उर्जेचा वापर करण्याचे फायदे हे प्रयोगातून मांडले. हवामान बदलावरदेखील प्रयोग मांडले होते.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *