facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / उत्तरानगरीला आठ दिवसांत पाणी द्या

उत्तरानगरीला आठ दिवसांत पाणी द्या

चिकलठाणा एमआयडीसीमधील उत्तरानगरी या भागाला आठ दिवसात महापालिकेने पाणी सोडावे, असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. या आदेशामुळे १० ते १५ वर्षांपासून हक्कासाठी लढत असलेल्या नागरिकांना न्याय मिळाला आहे.
चिकलठाणा एमआयडीसीमधील उत्तरानगरी या भागात नागरिक रस्ते, ड्रेनेज लाइन, पथदिवे, पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी १० ते १५ वर्षांपासून संघर्ष करत आहेत. महापालिकेकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने मदन कोकाटे, शिवाजी नाईकवाडे, विकास नवाथे, श्रीकृष्ण सोळंके, संतोष पटणे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या भागात जलवाहिनी असूनही महापालिका पिण्याचे पाणी पुरवत नाही. याचिकेच्या सुनावणीनंतर महापालिकेने उत्तरानगरीला येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरू करावा, असा आदेश खंडपीठाने दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अजित काळे, महापालिकेतर्फे संभाजी टोपे यांनी बाजू मांडली.

३४८ कोटींचा निर्णय घ्या
समांतर जलवाहिनीसाठी केंद्र शासनाने अनुदानापोटी १४३ कोटी ८६ लाख रुपये दिले आहेत. राज्य शासनाकडून पहिला हफ्ता म्हणून १७ कोटी ९४ लाख, असे १६१ कोटी ८० लाख रुपये व मनपाच्या हिश्‍श्‍याची रक्कम व त्यावरील व्याज असे एकूण ३४८ कोटी ८१ लाख रुपये महापालिकेकडे पडून आहेत. या योजनेच्या प्रस्तावावर १५ दिवसांत निर्णय घ्या, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *