facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / मुंबई / गॅदरिंगमधील ‘लाइव्ह’ नाटक-गाणं हरपलं…

गॅदरिंगमधील ‘लाइव्ह’ नाटक-गाणं हरपलं…

स्टेजसमोर प्रचंड गर्दी…आता पडदा उघडणार आणि आपलं नाटक सुरू होणार…डोक्यावरची टोपी तर पडणार नाही ना, डायलॉग विसरणार तर नाही ना, गाण्याचं दुसरं कडवं बाईंनी सांगितलेल्याच वरच्या पट्टीत होईल ना, अशा असंख्य प्रश्नांची धास्ती…पण आपला कार्यक्रम गर्दीतले आपले आई-बाबा पाहणार याचा केवढा आनंद…लहानपणी शाळेच्या गॅदरिंगमध्ये भाग घेताना मनातील हा कोलाहल मोठे झाल्यावर आयुष्यभराची गोड आठवण ठरते. पण हीच सुंदर ‘लाइव्ह’ आठवण आता ‘रेकॉर्डेड’ होऊ लागली आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींसमोर, बाई-सरांसमोर आणि शेजारी राहणाऱ्या आजी-आजोबांसमोर गाणं-नाटक ‘थेट’ सादर
करण्याची मजा आता काही शाळा मुलांपासून हिरावून घेऊ लागल्या आहेत.

अनेक शाळांमधील पाच-सहा रिकाम्या वर्गांमध्ये किंवा तळमजल्याच्या हॉलमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नाटक आणि गाण्यांचा आवाज घुमू लागतो. महिनाभराच्या दोन-तीन तासांच्या तालमीनंतर मग लांबघोळ झगा, अघळपघळ लेंगा, घट्ट धोतर, पिना टोचलेली साडी घालून स्टेजवर सर्वस्व झोकून देऊन करायचा आणि टाळ्यांचा दणदणाट ऐकून स्वत:वरच खूप खूष व्हायचे, ही भावनाच आता काही शाळांमधून हटवली जाऊ लागली आहे. आता बहुतांशी शाळांनी गॅदरिंगमधील कार्यक्रम चक्क स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आहे.

स्टुडिओत जाऊन स्क्रिप्ट वाचून, हवे तेवढे रिटेक घेऊन नाटक, गाणी रेकॉर्ड केले जातात आणि गॅदरिंगच्या दिवशी स्टेजवर चक्क सीडी लावली जाते आणि मुले तिथे फक्त ओठ हलवण्याच्या बाहुली भूमिका बजावतात. कोणताही लाइव्ह संवाद नाही, गाणं नाही, सगळं खोटं आणि रेकॉर्डेड…पण यामुळे मुलांच्या सभाधीटपणा व पाठांतरावरही परिणाम होण्याची भीती आहे.

इंटरनॅशनल स्कूल्सचा अट्टहास

‘इंटरनॅशनल’ म्हणवून घेणाऱ्या स्कूल्समध्ये सध्या ही पद्धत सुरू झाली आहे. पत वाढवण्यासाठीचा हा अट्टाहास ठरत आहे. प्रत्येक मुलाचा परफॉर्मन्स १०० टक्के अचूक झाला, कुणीही चुकलं नाही, हे पालकांना आणि प्रमुख पाहुण्यांना दाखवण्यासाठीचा अट्टहास!

(लेखक ‘रेडिओ मिर्ची’चे ‘आरजे’ आहेत.)

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *