facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / नाशिक / घंटागाडी ठेकेदाराला मनपाचा दणका

घंटागाडी ठेकेदाराला मनपाचा दणका

महापालिकेने नव्या घंटागाड्यांसाठी ठेकेदारांना २० डिसेंबरची मुदत दिल्यानंतरही शहरात केवळ ११० नव्या घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या ठेकेदाराविरोधात आक्रमक भूमिका घेत, मंगळवारपासून प्रतिघंटागाडी दहा हजार रुपये दंडाचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून ठेकेदाराने कमिटमेंट केलेल्या गाड्यांची मोजणी केली जाणार आहे. करारात नव्या घंटागाड्यांची संख्या २०६ असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. नव्या घंटागाड्यांचा तीन महिन्यांत आढावा घेतला जाणार असून, गरज पडल्यास घंटागाड्यांची संख्या वाढणार आहे.

महापालिका आणि घंटागाडी ठेकेदार यांच्यातील वाद संपत नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात नव्या घंटागाड्यांचे गाजावाजा करून उद््घाटन झाले. मात्र, अद्याप या घंटागाड्या पूर्ण क्षमतेने रस्त्यावर आलेल्या नाहीत. ठेकेदारांना नवीन घंटागाड्या रस्त्यावर आणण्यासाठी प्रशासनाने २० डिसेंबरची मुदत दिली होती. त्यामुळे चारही ठेकेदारांनी मंगळवारपर्यंत २०६ घंटागाड्या रस्त्यावर आणणे अपेक्षित आहे. मात्र, सोमवारपर्यंत आरोग्य विभागाच्या दप्तरी केवळ ११० घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या ठेकेदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या ठेकेदारांची बैठक मंगळवारी बोलावली असून, त्यांच्याकडून संपूर्ण गाड्यांचा आढावा घेतला जाणार आहे. करारात ठरल्यानुसार घंटागाड्या रस्त्यावर आल्या नाहीत, तर प्रतिघंटागाडी दहा हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. जीपीएस यंत्रणाही पूर्ण क्षमेतेने कार्यान्वित केली जाणार आहे.

जीपीएसशिवाय पेमेंट नाही

आयुक्त कृष्णा यांनी पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याबाबतही अधिकाऱ्यांना फटकारले आहे. पेस्ट कंट्रोलच्या तक्रारी असल्याने संपूर्ण पेस्ट कंट्रोल यंत्रणे जीपीएस सिस्टीम्स कार्यान्वित झाल्याशिवाय, तसेच त्याचा रिपोर्ट सादर केल्याशिवाय ठेकेदाराला पेमेंट अदा न करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास थेट निलंबनाची कारवाई करू, असा इशाराच आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिला आहे. त्यामुळे पेस्ट कंट्रोल ठेकेदाराची बनवेगिरीही उघड होणार आहे. सीसीटीव्ही यंत्रणा व पेस्ट कंट्रोलच्या जीपीएसची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *