facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / जिल्ह्यातील पंचवीस मदरशांची झाडाझडती

जिल्ह्यातील पंचवीस मदरशांची झाडाझडती

जिल्ह्यातील मदरशांविरुद्ध तक्रारी आल्यामुळे संपूर्ण मदरशांची ७ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली. मात्र यातील ज्या मदरशांमध्ये विद्यार्थी आढळले नाहीत, अशा २५ मदरशांची सोमवारी पुन्हा तपासणी करण्यात आली.
मुस्लिम मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान घेऊन मदरसे उभारण्यात आले, मात्र अनेकांनी मदरशे केवळ कागदोपत्री दाखवून तुंबड्या भरल्याची तक्रार आहे. अनेक मदरशे बंद असल्याच्या तक्रारी होत्या, शिवाय मदरशांचे सर्वेक्षण, तपासणी करण्याचे शासनाचे आदेश असल्याने जिल्ह्यातील २४६ मदरशांची तपासणी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या २५ पथकांकडून ही तपासणी करण्यात आली. ७ डिसेंबर रोजी झालेल्या तपासणीमध्ये ज्या मदरशांमध्ये विद्यार्थी आढळले नाहीत तेथे उरुसाची सुटी असल्याचे कारण सांगण्यात आले होते. या मदरशांची सोमवारी अचानक तपासणी करण्यात आली. या शिवाय ज्यांचा पत्ता सापडला नाही, इतर कारणांमुळे कुलूपबंद असलेल्या मदरशांचीही तपासणी यावेळी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या मदरशांमध्ये नव्याने दाखल केलेल्या प्रस्तावांचाही समावेश आहे.
मदरसे तपासणीचा संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी डी. एस. चव्हाण यांनी सांगितले.

अनुदानित ६४ पैकी ३४ मदरसे बंद
पथकाच्या तपासणीअंती वर्ष २०१५-१६ मध्ये अनुदान प्राप्त असलेल्या ६४ मदरशांपैकी केवळ ३० मदरसे सुरू असल्याचे उघड झाले आहे. ३४ मदरसे पथकाला बंद आढळले. ६१ अनुदान न मिळालेल्यांपैकी २२ मदरसे सुरू तर ३९ मदरसे पथकाला बंद असल्याचे निदर्शनास आले.

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *