facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / त्रासदायक अतिक्रमण हटवले

त्रासदायक अतिक्रमण हटवले

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – ग्रामदैवत विशाल गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रासदायक ठरणारे अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी हटवले. यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले असून या मोहिमेमध्ये सातत्य ठेवण्याची मागणी केली आहे.

मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी सकाळी औरंगाबाद रोडवरील मनपा इमारतीपासून स्टेशन रोडवर कारवाई करीत रस्त्यावर लावलेले बेकायदा फलक हटवले. त्यानंतर दुपारी दोननंतर अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माळीवाडा वेस येथे येऊन विशाल गणपती मंदिराच्या परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी अडचणीचे ठरणारे अतिक्रमण हटवले.

या भागात खाद्यपदार्थांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात उभ्या करण्यात येत असल्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्यांची वाहने लावण्यासाठी जागा मिळत नव्हती. पर्यायाने, भाविकांना रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करावी लागत होती. बेशिस्त पद्धतीने लावलेल्या या वाहनांमुळे माळीवाडा परिसरामध्ये वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. याबाबत तक्रारी वाढल्यामुळे अतिक्रमण विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *