facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / पुणे / पुणे व्हावी ‘अॅक्सेसिबल सिटी’

पुणे व्हावी ‘अॅक्सेसिबल सिटी’

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारामध्ये जो ‘स्मार्टनेस’ होता, तो ‘स्मार्टनेस’ पुण्याचा विकास करताना आणायचा आहे. पुणे ही ‘पॉलिश’ सिटी नाही तर ती ‘अॅक्सेसिबल’ सिटी तयार करायची आहे. आधुनिक भारतामध्ये पुणे हे महत्त्वाचे शहर असण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या नूतनीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल ​शिरोळे, आमदार विजय काळे, मेधा कुलकर्णी,भीमराव तापकीर, योगेशे ​​टिशेकर, माजी खासदार प्रदीप रावत, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाचे उद्घाटन माझ्या हस्ते होत असून, हा माझ्यासाठी गौरवाचा दिवस आहे. सावरकरांचे स्मारक पूर्ण होण्यासाठी इतके वर्ष लागावे, हे या देशाचे दुर्देव आहे. खऱ्या देशभक्तांकरिता खूप संघर्ष करावा लागला आणि काही व्यक्ती कशा देशभक्त झाल्या, हे समजले सुद्धा नाही. खरे देशभक्तांना स्मारकांची आवश्यकता नाही. सावरकरांचे स्मारक प्रत्येकाच्या मनात आहे आणि ते चिरकाल ​टिकून राहील, असे फडणवीस म्हणाले.
पुणे हे आधुनिक झाले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील स्मार्टसिटीमध्ये पुण्याचे महत्वाचे शहर म्हणून निवड केली. स्मार्टसिटी प्रकल्पाचे उद्घाटन पुण्यात करण्यात आले. पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समृद्ध केलेले हे शहर आहे. देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. या शहराला तोच दर्जा द्यायचा आहे. आधुनिक भारतामध्ये पुणे हे महत्वाचे शहर असले पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारामध्ये जो ‘स्मार्टनेस’ होता, तो ‘स्मार्टनेस’ पुण्याचा विकास करताना आणायचा आहे. आपल्यासा पॉलिश सिटी तयार करायची नाही तर ‘अॅक्सेसिबल’ सिटी तयार करायची आहे. पुण्यात मेट्रो आली असून या मेट्राचे भूमिपुजन पंतप्रधानांच्या हस्ते २४ तारखेला होत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
त्या वेळच्या महापौरांना परवानगी नव्हती
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाची २००३ साली निर्मिती झाली. या स्मारकाच्या उद्घाटनाला त्यावेळच्या महौपारांनी जायचे नाही, असा त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून आदेश होता. मला अशा प्रकारचा कुठलाही आदेश नाही. मुख्यमंत्री ज्या पिढीचे नेतृत्व करतात, त्याच पिढीतला मी ही आहे. या पिढीने आता भान ठेऊन वर्गवारी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मी पदावर असताना असा कुठलाही वर्गभेद, जातीभेद केला नाही, तो मला मान्य नाही,’ असे महापौर जगताप म्हणाले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *