facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / जळगाव / पैसे, मोबाइल चोरणाऱ्या तरुणाला अटक

पैसे, मोबाइल चोरणाऱ्या तरुणाला अटक

मू. जे. महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील रॅकमध्ये विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या बॅगांमधून पैसे, मोबाइल व पुस्तके चोरणाऱ्या संशयितास विद्यार्थ्यांनीच पकडून प्राचार्यांसमोर उभे केले. हा विद्यार्थी सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली.

मू. जे. महाविद्यालयात ज्ञानरंजन ग्रंथालय आहे. त्याच्या तळमजल्यावर असलेल्या रॅकमध्ये विद्यार्थ्यांना आपली बॅग ठेवावी लागते. मगच त्यांना आत जाता येते. या रॅकमध्ये ठेवलेल्या बॅग्जमधील वस्तू व पैसे चोरी होत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून घडत होत्या. दोन महिन्यांत सहा विद्यार्थ्यांचे मोबाइल चोरी झाले होते. या प्रकारांना कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी ग्रंथपाल विजय कंची यांच्याकडे तक्रार केली. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर ग्रंथालयातील १७ डिसेंबर रोजीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात एक जण हा बॅग उचलून निघून जाताना दिसला. ग्रंथपाल कंची यांनी हे सीसीटीव्ही फुटेज विद्यार्थ्यांना दाखविले आणि संशयितावर लक्ष ठेवण्यास सांगितले.

सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महाविद्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील संशयितासारखा दिसणारा एक तरुण फिरत होता. त्याला विद्यार्थ्यांनी पकडले आणि प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांच्या दालनात उभे केले. या ठिकाणी संशयिताची चौकशी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. संशयित तरुण तृतीय वर्ष कला शाखेचा नापास विद्यार्थी असल्याचे समोर आले. त्याचे नाव निखील पाटील (वय २२, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण) असे आहे. त्याने चोऱ्यांची कबुली दिली. या चोरट्याची तक्रार पोलिसात देणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी दिली.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *