facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / मुंबई / मुंबईतील एअर इंडियाच्या इमारतीत आग

मुंबईतील एअर इंडियाच्या इमारतीत आग

दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट इथल्या एअर इंडियाच्या इमारतीत आग लागली असून अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. ही आग २२व्या मजल्यावर लागल्याचं समजतं, पण आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

आग नेमकी किती मोठी आहे आणि आगीच्या वेळी कार्यालयात कुणी उपस्थित होतं का, याबाबतही अद्याप माहिती मिळालेली नाही.

मरीन ड्राइव्हला लागूनच असलेली एअर इंडियाची इमारत २३ मजल्यांची आहे. २०१३ पर्यंत हेच एअर इंडियाचं मुख्यालय होतं. आता कंपनीचं कॉर्पोरेट ऑफिस दिल्लीला हलवण्यात आलं असलं, तरी २१, २२ आणि २३व्या मजल्यावर एअर इंडियाचं मुंबईतील काम चालतं.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *