facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / पुणे / मुख्यमंत्र्यांनी फुंकला निवडणुकीचा बिगुल

मुख्यमंत्र्यांनी फुंकला निवडणुकीचा बिगुल

‘शहराची महती जगभर पसरली असली, तरी त्याच्या कीर्तीला अनुरूप पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे आजवर लक्ष दिले गेले नाही. पुण्याकडे केवळ सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून पाहण्यातच यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी धन्यता मानली,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या शहरातील कारभाऱ्यांवर टीका करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महापालिका निवडणुकांचा बिगुल फुंकला.

शहराच्या वेगवेगळ्या भागांतील विकासकामांचा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभांमध्ये त्यांनी पालिकेतील कारभाऱ्यांवर निशाणा साधला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून नावलौकिक मिळविण्याची शहराची क्षमता असूनही, त्या दृष्टीने प्रयत्न करण्याऐवजी ‘मलिदा कोणाला मिळेल’ यामध्ये पालिकेतील सत्ताधाऱ्यांना अधिक रस असल्याची टीका त्यांनी केली. राज्य सरकारने रखडलेल्या अनेक विकासकामांना गती दिली असून, शहराला आधुनिक आणि स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचा दावाही फडणवीसांनी केला.

ते म्हणाले, ‘पुण्याच्या विकासासाठी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि शहरातील इतर सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन विविध प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. शहराचा मेट्रो प्रकल्प, पीएमआरडीए, रिंगरोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, नदीसुधार योजना, सर्वांसाठी घर, झोपडपट्टीमुक्त पुणे अशा अनेक प्रकल्पांना चालना देण्यात आली असून, यापुढेही पुण्यातील समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.’

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *