facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / शेतकऱ्यांना वीज दरवाढीचा शॉक

शेतकऱ्यांना वीज दरवाढीचा शॉक

महाराष्ट्र विद्यूत नियामक आयोगाने यावेळी सर्वाधिक ४० ते ९० टक्के वीज दरवाढ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांवर लादली आहे. जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या हाती वीजबील पडताच त्यांना दरवाढीचा मोठा शॉक बसल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी या जाचक दरवाढीचा विरोध करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केले.

आज शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत अडचणीची आहे. आयोगाने लागू केलेल्या दरातील वाढीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. यापूर्वी शासनाने जाहीर केलेले सवलतीचे वीजदर तीन हॉर्सपॉवरपर्यंत ५५ पैसे प्रतियुनिट व ३ हॉर्सपॉवरच्या वर ८५ पैसे प्रतियुनिट यामध्ये १ नोव्हेंबरपासून ३६ पैसे प्रतियुनिट वाढ झाली आहे. विनामीटर शेतीपंपाचे सवलतीचे वीजदर प्रतिहॉर्सपावर दरमहा ८५ रुपये होते. ते १२९ रुपयांपर्यंत वाढविले आहे. उच्च दाब वीजग्राहकांमध्ये राज्यातील उपसा सिंचन योजनांचे सवलतीचे दर ७२ पैसे प्रतियुनिट होते, त्यामध्ये ६५ पैसे प्रतियुनिट वाढ केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित कृषीमालाला भाव मिळत नाही.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. अशा स्थितीत त्यांच्यावर वीजदर वाढीचा बोजा टाकून त्यांच्या अडचणीत वाढ करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांनी व शेतकऱ्यांनी या दरवाढीचा विरोध करावा. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी मेळावे घेऊन शेतकरी जागरण चळवळ सुरू करण्यात येईल, असेही होगाडे यांनी यावेळी जाहीर केले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *