facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / आढळातून देणार यंदा चार आवर्तने

आढळातून देणार यंदा चार आवर्तने

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – आढळा धरणातून यावर्षी रब्बीसाठी दोन व उन्हाळी हंगामासाठी दोन अशी चार आवर्तने देण्यात येणार आहेत. येथील शासकीय विश्रामगृहावर आमदार वैभव पिचड यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.

आढळा धरणाच्या लाभक्षेत्रात अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील सोळा गावांचा समावेश आहे. आढळा धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे. १ हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या धरणात सध्या ९९० दलघफू पाणी शिल्लक आहे. यातील ८५ दलघफू मृतसाठा आहे. धरणाच्या पाण्याच्या नियोजनासाठी सोमवारी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. अभियंता किरण देशमुख, उपविभागीय अधिकारी जी. जी. थोरात, सहायक अभियंता डी. टी. वाकचौरे, शाखाधिकारी आर. एम. देशमुख (चिकणी), टी. डी. पाटील (गणोरे) आदी उपस्थित होते.

आढळा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीवर देवठाणच्या ग्रामस्थांनी बहिष्कार घातल्याचे निवेदन सरपंच व विकास सोसायटीचे अध्यक्ष यांच्या व काही कार्यकर्ते शेतकर्‍यांच्या स्वाक्षरीनिशी कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. १९७५ पासून २०१४ पर्यंत कालवा सल्लागार समितीची बैठक देवठाण येथे धरणस्थळावर होत आली आहे; मात्र, मागीलवर्षापासून ती जाणीवपूर्वक अकोले येथे घेण्यात येत असून ती आढळा धरणावर घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

२६ डिसेंबरपासून पहिले आवर्तन

आढळा धरणातून पहिले आवर्तन २६ डिसेंबर रोजी सोडले जाणार आहे. सुमारे २५ दिवस हे आवर्तन सुरू राहील. साधारण २५० दलघफू पाणी वापर या आवर्तनात होईल. दुसरे आवर्तन ५ ते १० फेब्रुवारी या कालावधीत तर तिसरे आवर्तन १५ मार्चच्या सुमारास सोडण्यात येणार आहे. चौथे आवर्तन १५ एप्रिलला सोडले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *