facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / नोटा बदलून देणारा बँक अधिकारी अटकेत

नोटा बदलून देणारा बँक अधिकारी अटकेत

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्केट यार्ड शाखेत बेकायदेशीरपणे सहा लाख ९२ हजार, ५०० रुपयांच्या नोटा बदलून देणाऱ्या बँक अधिकारी चंद्रकांत मल्लू चव्हाण (रा. शांतीनगर, उचगाव) याला शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. १४ डिसेंबपासून संशयित चव्हाण फरारी होता.

चव्हाण हे बँकेत कस्टमर असोसिएट (लोकसेवक) पदावर कार्यरत आहेत. आठ डिसेंबरपासून पाचशे व हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त चार हजार रुपयांच्या जुना नोटा बदलून नव्या देण्याचा नियम होता. नोटा बदलून देताना अर्ज, ओळखपत्र व केवायसी पूर्ण करून नोटा बदलून देणे अपेक्षित होते. पण चव्हाण यांनी सर्व नियम डावलून सहा लाख ९२ हजार रुपयांच्या नोटा बदलून दिल्या होत्या. या घटनेनंतर शाखा व्यवस्थापक धनंजय अभ्यंकर (५६, ला. विश्वकर्मा प्रेस्ट‌िज, खानविलकर पेट्रोल पंपाजवळ, नागाळा पार्क) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या घटनेनंतर चंद्रकांत चव्हाण कुटुंबासमवेत तिरुपती येथे गेल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. मंगळवारी (ता. २०) चव्हाण घरी आल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी उचगाव येथील घरी जाऊन चव्हाण याला अटक केली. कन्याकुमारी, तिरुपती येथे फिरायला गेलो होती, अशी माहिती चव्हाण याने पोलिसांना दिली. बुधवारी चव्हाण याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *