facebook
Monday , February 20 2017
Breaking News
Home / Featured / मुंबईत भायखळ्यात लागलेली आग आटोक्यात

मुंबईत भायखळ्यात लागलेली आग आटोक्यात

भायखळा पश्चिमेस असलेल्या बदलू रंगारी मार्ग व मेघराज सेठी मार्गाच्या नाक्यावर असलेल्या झोपडपट्टीला लागलेली आग मोठ्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आली आहे. या आगीत १५ ते २० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर अग्निशमनदलाचा एक अधिकारी आणि एक महिला जखमी झाले आहेत.

रात्री साडे दहाच्या सुमारास भायखळ्यातील झोपडपट्टीला आग लागली. यानंतर अग्निशमनदलाला याची माहिती देण्यात आली. आगीने रौद्र रूप घेतल्याने अग्निशमनदलाच्या १४ गाड्या, १० पाण्याचे टँकर आणि ५ जम्बो टँकवर घटनास्थळी पाठवण्यात आले. या घटनेत कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. पण आग आटोक्यात आणत असतानाच्या कामात अग्निशमनदलाचे अशोक बने हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचबरोबर एक महिलाही जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *